महापालिकेचे काम पोलिसांवर करण्याची वेळ ! नागरिकांचे हाल बघवले नाही, कळमणा पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे
By शुभांगी काळमेघ | Updated: September 27, 2025 18:33 IST2025-09-27T18:31:24+5:302025-09-27T18:33:30+5:30
Nagpur : या गंभीर समस्येचा विचार करून, कळमणा पोलिसांनी पुढाकार घेऊन, विविध साहित्य जसे माती, गिट्टी, व वाळू वापरून त्या खड्ड्यांना भरले.

Time to leave the work of the Municipal Corporation to the police! The plight of the citizens was not looked after, the Kalamana police filled the potholes on the roads
नागपूर : शहरातील कळमणा पोलिसांनी रस्त्यावरील गंभीर खड्डे स्वतःच भरून, महानगरपालिकेला निदर्शक पावले उचलली आहेत. या कृतीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पण महापालिका प्रशासन काय करतेय हा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे.
कामठी रोडजवळील पुलाजवळ अनेक खोल खड्डे निर्माण झाले होते, विशेषत: सतत होणाऱ्या पावसामुळे ते खड्डे पाण्याने भरून जात. अशा परिस्थितीत, वाहनचालकांना अनेकदा अपघात होण्याची भीती वाढली होती आणि वाहतुकीतही अडथळे निर्माण होऊ लागले होते.
या गंभीर समस्येचा विचार करून, कळमणा पोलिसांनी पुढाकार घेऊन, विविध साहित्य जसे माती, गिट्टी, व वाळू वापरून त्या खड्ड्यांना भरले. पोलिसांनी हे काम नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता केले आहे पण ज्यांची हे जबाबदारी आहे ते प्रशासन कुठे सुस्त पडून आहे अशे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, अशी उदाहरणात्मक कामगिरी प्रशासनाला जागृत करण्यास पुरेशी आहे. अनेकांनी हे सांगितले की, “पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतः पुढाकार घेतला, ही महानगरपालिकेसाठी एक स्पष्ट संदेश आहे.” या घटनेनंतर पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारल्याने प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे की पुढील कामे त्वरित आणि नियमितपणे पार पाडावी.