शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलचा पंप ठरला चिमुकल्यासाठी काळ

By admin | Updated: November 9, 2016 03:02 IST

बोअरवेलची मशीन बाहेर काढताना लोखंडी साखळी तुटून त्याचा हूक मानेत फसल्यामुळे एका चिमुकल्याचा करुण अंत झाला.

वाहनांची तोडफोड, तणाव : सोसायटी सचिवासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखलनागपूर : बोअरवेलची मशीन बाहेर काढताना लोखंडी साखळी तुटून त्याचा हूक मानेत फसल्यामुळे एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. सय्यद अरमान ऊर्फ अलफेस अली आबिद अली (वय ४ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक रोड परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफोड करून रोष व्यक्त केला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत असलेल्या सोसायटी सचिवासह तिघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महालमधील नाईक रोड भागात सुधाकरराव निंबाळकर यांच्या घराजवळ आबिद अली यांचे कुटुंबीय राहतात. आबिद यांना अरमान (वय ४) आणि रुमान ( वय ६) ही दोन मुले आहेत. या ठिकाणी बालाजी रेसिडेन्सी ही बहुमजली इमारत आहे. तेथील बोअरवेलची मशीन नादुरुस्त झाल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ती दुरुस्त करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले होते. कंत्राटदाराने मजुरांकरवी दुपारी बोअरवेल दुरुस्तीचे काम सुरू केले. दुपारी २.३० च्या सुमारास लोखंडी हूक असलेली साखळी ट्रॅक्टरला (एमएच ४०/ एएच ०२२६) बोअरवेल सबमर्सिबल पंप बांधून वर ओढण्याचे (बाहेर काढण्याचे) काम सुरू होते. यावेळी चिमुकला अरमान आणि रुमान शेजारच्या मुलांसोबत बाजूला खेळत होते. अचानक ट्रॅक्टरने ओढली जाणारी साखळी तुटली आणि उसळलेल्या साखळीचा हूक अरमानच्या मानेत (कॉलर बोन) फसला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे रुमानसह त्याचे सवंगडी आरडाओरड करू लागले. त्यामुळे अल्पावधीतच बघ्यांची मोठी गर्दी जमली. अपघाताचे विदारक दृश्य पाहून नागरिकांमध्ये थरार निर्माण झाला. जखमी अरमानला प्रारंभी बाजूच्या डॉक्टरकडे आणि नंतर मेयोत नेण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी अरमानला मृत घोषित केले. रुमानला जबर मानसिक धक्का चुणचुणीत अरमान कुणासोबतही सहज गप्पा करीत होता. त्यामुळे तो या भागात अनेकांचा लाडका होता. अरमानच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. डोळ्यादेखत लहान भावाचा मृत्यू झाल्यामुळे रुमानला जबर मानसिक धक्का बसला आहे. तोडफोड, प्रचंड तणावया घटनेमुळे अरमानच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला. अरमानचे वडील आबिद अली एका खासगी फायनान्स कंपनीत काम करतात. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ते पाहून काम घेणारा कंत्राट आणि मजूर पळून गेले. माहिती कळताच कोतवालीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. अरमानच्या वडिलांकडून पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. चिमुकल्या अरमानच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या तिघांविरुद्ध कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. दराडे यांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यात बालाजी रेसिडेन्सी सोसायटीचे सचिव निरंजन गोपीलाल सूरजन, ट्रॅक्टर मालक कृष्णा शंकरराव परतेकी आणि चालक राजकुमार दादाजी टेंभरे या तिघांवर गुन्हे दाखल केले. प्राथमिक चौकशीतून या तिघांवर गुन्हे दाखल केले. आरोपींच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे कोतवाली पोलिसांनी सांगितले.