शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

नागपुरातील १५ हजार कपड्यांच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 6:54 PM

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्दे गावी जाण्याची व्यवस्था करा : लालगंज सुधार समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शहरातील शांतिनगर, पाचपावली, यशोधरानगर, लकडगंज आणि तहसिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नाईक तलाव, तांडापेठ, बंगलादेश, लालगंज, यशोधरानगर, पाचपावली, कुंदनलाल गुप्तानगर, झाडे चौक, मोमिनपुरा, गोंडपुरा, बस्तरवारी, टेका नाका, गुलशननगर, दलाल चौक, कमाल चौक, मोठा ताजबाग परिसरात कपड्यांच्या व्यवसायातील जवळपास १५ हजार कारागीर राहतात. हे कारागीर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम जि. पूर्व मेदनीपूर येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावापासून १५०० किलोमीटर दूरवर ते आले आहेत. अनेकांनी भाड्याच्या जागेवर कारखाना सुरू केला तर अनेकजण या कारखान्यात कारागीर म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. महिनाभरापासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच घरमालकही किरायासाठी तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे राज्य शासन तसेच प्रशासनाने या कारागिरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लालगंज सुधार संघर्ष समितीने केली आहे. या अडचणीत सापडलेल्या कारागिरांना मदत करण्यासाठी लालगंज सुधार संघर्ष समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे, पदाधिकारी विलास पराते, विद्यासागर शाहू, दिनेश राऊत, नंदू वैरागडे, हरिभाऊ आमदरे, गोलू बोकडे, विलास धार्मिक, बंटी शेवडे यांनी पुढाकार घेतला. समितीने अनेक संस्थांच्या माध्यमातून या कारागिरांची भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु या कारागिरांची होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याची मागणी समितीने केली आहे.व्यापाऱ्यांकडूनही पैसे मिळेनाकपड्याच्या व्यापाऱ्यांकडूनही त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे या कारागिरांचा नेता शहाजन खान यांनी सांगितले. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावाकडे नातेवाईकही या कारागिरांची चिंता करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर