शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 02:36 IST

पैशाच्या देवाण-घेवाणबाबत वाद झाल्याने कोलकात्यातील अलिबाग येथून आलेल्या एका वृद्ध टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कळमन्यातील घटना : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून होता वाद नागपूर : पैशाच्या देवाण-घेवाणबाबत वाद झाल्याने कोलकात्यातील अलिबाग येथून आलेल्या एका वृद्ध टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी कळमना येथील न्यू माँ उमिया औद्योगिक वसाहत येथे घडली. शालिकराम बुरहू शुक्ला (६८) रा. बहुजी हट्टी हातीपारा रोड अलिबाग कोलकाता असे पीडित टिंबर व्यापाऱ्याचे नाव आहे. आरा मशीन मालक परवेज भाई आणि कार चालक प्रमोद ऊर्फ गुड्डू ठाकूर (एजंट) असे आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार शालिकरामच्या मुलाकडून आरोपींना १५ ते २० लाख रुपये घ्यायचे होते. परंतु त्यांचा मुलगा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. गुरुवारी शालिकराम त्यांना कापसी येथे भेटले. त्यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा आपल्या मुलाच्या देवाण-घेवाणीबाबत आपला कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांना गालावर थापड मारली. नंतर सायंकाळी ४.३० वाजता आरोपी शालिकरामला एमएच/४९/६१५७ क्रमांकाच्या गाडीत बळजबरीने बसवून परवेजच्या कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथे त्यांना मारहाण केली. यात शालिकराम जखमी झाले. यानंतर कंपनीच्या एका खोलीत त्यांना बंद करून ठेवले. इकडे शालिकराम यांना बळजबरीने गाडीत बसवतांना त्यांच्या काही व्यापारी मित्रांनी पाहिले होते. परवेजच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनीच त्यांना सोडविले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)