आदासा येथील तिळी चतुर्थी यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:59+5:302021-02-05T04:40:59+5:30

सावनेर : आदासा (ता. कळमेश्वर) येथील श्री गणपती मंदिरात तिळी चतुर्थीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. यावर्षी तिळी चतुर्थी रविवारी (दि. ...

Tili Chaturthi Yatra at Adasa canceled | आदासा येथील तिळी चतुर्थी यात्रा रद्द

आदासा येथील तिळी चतुर्थी यात्रा रद्द

सावनेर : आदासा (ता. कळमेश्वर) येथील श्री गणपती मंदिरात तिळी चतुर्थीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. यावर्षी तिळी चतुर्थी रविवारी (दि. ३१) असून,काेराेना संक्रमणामुळे ही तिळी चतुर्थी यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव ॲड. श्रीकांत पांडे यांनी दिली.

या मंदिराच्या परिसरात दरवर्षी तिळी चतुर्थीनिमित्त माेठी यात्रा भरत असून, हजाराे भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी तिळी चतुर्थी रविवारी (दि. ३१) आहे. काेरेाना संक्रमण विचारात घेता, या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे यात्रेबाबत परवानगी मागण्यात आली हाेती. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार ही यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी श्री गणपतीच्या दर्शनासाठी येऊ नये तसेच देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे सचिव ॲड. श्रीकांत पांडे यांनी केले आहे.

Web Title: Tili Chaturthi Yatra at Adasa canceled