शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

टिकेकरांनी अभिजातपणा जोपासला

By admin | Updated: January 24, 2016 02:43 IST

भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, ...

श्रीपाद जोशी : अरुण टिकेकर यांना श्रद्धांजलीनागपूर : भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, याची जाणीव एक संपादक म्हणून डॉ. अरुण टिकेकरांना होती. व्यावसायिकता वाढलेल्या काळातही डॉ. टिकेकरांनी पत्रकारितेतील अभिजातपणा आणि सत्यता जपली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.डॉ. अरुण टिकेकर यांच्या श्रद्धांजली सभेत अध्यक्षस्थानी बोलतांना श्रीपाद जोशी यांनी टिकेकरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या अभिजातपणामुळे बॉस म्हणून वागण्यात कडकपणा आला असेल, मात्र बौद्धिक अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. वाचकांना जे हवे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने केले. टिकेकरांमुळेच वृत्तांत किंवा पुरवणी पत्रकारितेचा उगम झाल्याचे जोशी म्हणाले. डॉ. टिकेकर यांनी इतिहासाला वेगळी दिशा दिली. पुणे शहर इतिहास ग्रंथाचे उदाहरण देत स्थानिक सामान्य माणसांच्या भावभावना, जडणघडण, त्यांच्या संस्कृतीची सत्यता इतिहास रुपाने संपादित करण्याचे मोलाचे योगदान डॉ. टिकेकरांनी दिले असून विदर्भाचा इतिहास लिहिताना टिकेकरांचे कार्य प्रेरणा देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली सभेच्यावेळी डॉ. टिकेकर यांची ज्येष्ठ बहीण सुनंदा मोहनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कौटुंबिक जडणघडणीच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. आजोबा, वडील आणि काका विचारवंत होते आणि या सर्वांनी निर्भिडपणे आपले विचार स्पष्टपणे समाजासमोर मांडले. त्यांचा ग्रंथप्रेमाचा आणि व्यासंगतेचा हाच वारसा अरुणने पुढे चालविल्याचे त्या म्हणाल्या. अरुण आणि आमच्या तीन पिढ्यांनी नवे विचार स्पष्टपणे मांडून विवेकाचा जागर केल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र मोठ्या बहिणीने लहान भावाला श्रद्धांजली अर्पण करण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुनंदा मोहनी यांचे पती दिवाकर मोहनी यांनीही आपले विचार मांडले. डॉ. टिकेकरांना गुरू मानणारे सुरेश भुसारी यांनी संपादकाची ओळख फोटोतून नाही तर लेखणीतून झाली पाहिजे, असे सांगणारे अरुण टिकेकर उदारमतवादाला समोर नेणारे संपादक असल्याची भावना व्यक्त केली. श्रद्धांजली सभेचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.(प्रतिनिधी)