शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

गाळात फसून वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 8:11 PM

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील मानसिंगदेव अभयारण्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचामृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे नियमित गस्त करत असताना वनपाल जीवन पवार आणि इतर वनरक्षक यांना एक प्रौढ वाघ गाळात फसलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर,उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध नंदागवळी, डॉ. चेतन पातोंड, डॉ. विनोद समर्थ, सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) अतुल देवकर घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीपासून ५०० मीटर परिघामध्ये तपास केला असता कोणत्याही प्रकारची अवैध बाब त्यांना आढळून आली नाही. वाघिणीचे चारी पाय खोल गाळात फसलेले आढळून आले तसेच तोंडाचा भाग तसेच शरीराचा भाग देखील गाळात फसल्याचा दिसून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून येते. सादर वाघिण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीचे नखे, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले. शवविच्छेदनानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष वाघिणीचे दहन करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या संशोधक आकांक्षा यांनी सदर वाघिणीची ओळख पटविली. त्यांच्या सांगण्यानुसार सदर वाघिण अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आली होती.मृत्यू किती दिवसांपूर्वी ?ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बहुतेक सात ते आठ दिवसापूर्वीची असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र या परिसरात जर वनविभागाची नियमित गस्त असेल तर त्यांना ही बाब उशिरा का लक्षात आली, हा प्रश्नच आहे. यासोबत गाळात फसलेल्या वाघिणीने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही का, हाही एक प्रश्न आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू