शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडीत परतले वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:40 IST

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे

ठळक मुद्देअवैध मासेमारीवर पूर्णत: नियंत्रण

ऑनलाईन लोकमत नागपूर : पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. तोतलाडोह संरक्षित क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी व त्यातून होत असलेल्या शिकारीतून परिसरातील वाघांसह वन्यजीव नाहीसे झाले होते. परंतु वन विभागाने राबवलेल्या विशेष अभियानामुळे या परिसरातील मासेमारीच्या नावावर सुरू असलेल्या वन्यजीवांच्या शिकारीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्याचाच परिणाम या परिसरात पुन्हा वाघ परतले आहेत. शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली . तेव्हा हा सुखद क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला.एसीएफ भागवत यांनी सांगितले की, पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोडलाडोह परिसरात असलेल्या गोलपहाडी येथे अनेक दशकांपासून अवैध मासेमारी सुरू होती. मासेमारी करण्यासाठी येणारे लोक केवळ माशांचीच शिकार करीत नव्हते तर ते हरीण, ससे यासारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांचीही शिकार करायचे. वाघांसह मगरीचीही शिकार केली जात होती. हे एक मोठे रॅकेट होते. नागपूर ते सिवनीपर्यंत त्याचे तार जुळले होते. मासेमारी करणाºया स्थानिकांच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात होती. यासाठी मासेमारी करण्यासाठी काही लोकांना वेतनसुद्धा दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी या परिसरात जेव्हा दोन शिकाऱ्यांना वाघाच्या हाडासह पकडण्यात आले. तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी दरम्यान स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मासेमारी करणाऱ्यांना अटक केली. तेव्हा हे रॅकेट उघडकीस आले. या अवैध मासेमारी व शिकारीची जवळपास १२० कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असल्याचे तेव्हा उघडकीस आल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ही मासेमारी बंद करणे एक आव्हान होते. यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जेव्हा कधी कारवाई केली जात होती. तेव्हा मासेमारी करणारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत होते. पेट्रोल बॉम्बने ते हल्ले करायचे.फिल्ड डायरेक्टर ऋषिकेश रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यासाठी पुढाकार घेतला. एसआरपीएफ आणि स्पेशन टायगर प्रोटेक्शन फोर्स यांनी ८० जणांची एक विशेष टीम तयार केली. विशेष योजना तयार करण्यात आली. संपूर्ण परिसरात नेटवर्क तयार करण्यात आले. पेट्रोलिंग बोटीसह दोन अतिरिक्त बोटी मागवण्यात आल्या. ४५ दिवस हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात मासेमारीसाठी लपवून ठेवण्यात आलेल्या १५० बोटी आणि मासेमारी व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लपविण्यात आलेले पाच हजार जाळ्या पकडून त्या नष्ट करण्यात आल्या. बोट तयार करणाऱ्या स्थानिकांना बोटीची संपूर्ण माहिती ठेवण्यास सांगण्यात आले. परिणामी या परिसरातील मासेमारीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे आता येथे पुन्हा वन्यजीव सुरक्षित झाले आहे. वाघही परतले आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर