वाघाने केली बैलाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:51+5:302021-08-26T04:11:51+5:30

उमरेड : येथून २५ किलोमीटर अंतरावरील तालुक्यातील जामगड येथे वाघाने बैलाची शिकार केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ...

The tiger hunted the bull | वाघाने केली बैलाची शिकार

वाघाने केली बैलाची शिकार

उमरेड : येथून २५ किलोमीटर अंतरावरील तालुक्यातील जामगड येथे वाघाने बैलाची शिकार केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. उत्तर वनपरिक्षेत्रातील ही घटना असून, गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

अरुण कोडापे यांची जामगड शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात सहा बैल खुंटीला बांधून होते. सकाळीच वाघाने एका बैलावर हल्ला केला. यामध्ये सदर बैल गंभीर जखमी झाला. त्यानंतर वाघाने अन्य एका बैलावर झडप घातली. दुसऱ्या बैलाचा जागीच फडशा पाडत वाघाने काही अंतरापर्यंत बैलाला फरफटत नेले.

अरुण कोडापे शेतात पोहोचल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. गावकरी गोळा झाले. वनविभागाला याबाबतची सूचना देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. परिसरात चार कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: The tiger hunted the bull