नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वाघ आला रे वाघ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:59 IST2018-10-13T23:57:36+5:302018-10-13T23:59:31+5:30
वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वाघ आला रे वाघ !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नरखेड ): वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रफुल्ल गजबे, रा. खरसोली यांच्या खरसोली-थूगाव(निपाणी)दरम्यानच्या शेतात त्यांचा बैल शनिवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आला. परिसरातील शेतकऱ्यांनी बैलाची पाहणी केली. शिवाय, शेतात पाऊलखुणा आढळून आल्याने वन अधिकाऱ्यांना बोलावले. त्या पाऊलखुणा वाघाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या भागात १५ दिवसांपासून वाघ फिरत असल्याचे काहींनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून, बहुतांश शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्री शेतात जावे लागते. त्यातच तालुक्यात घनदाट जंगल नसताना वाघाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. हा वाघ कुठून, कसा व केव्हा आला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी केले.