शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी 'बायोडाटा' नव्हे, कामगिरीवरच तिकीट : नड्डा, गडकरी यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:51 IST

मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देसंकल्प मेळाव्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तिकिटासाठी दावेदारांची मोठी यादी आहे. अनेक जण मोठ्या नेत्यांकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत तर बरेच लोक ‘बायोडाटा’ सादर करत आहेत. मात्र पक्षाकडे सर्वांचीच कुंडली आहे. मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले. नागपुरात संकल्प मेळाव्यादरम्यान दोघाही राष्ट्रीय नेत्यांनी विदर्भातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही.सतीश, राज्य प्रभारी सरोज पांडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री अनिल बोंडे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ.चैनसुख संचेती, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी खासदार दत्ता मेघे व अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, शहराध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांच्यासह विदर्भातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भाजपाकडे आजच्या तारखेत नेतादेखील आहे आणि योग्य नीतीदेखील आहे. पक्षाकडून काही तरी मिळालेच पाहिजे ही अपेक्षा न बाळगता कार्यकर्त्यांनी विचारधारेवर कायम राहून काम केले पाहिजे. निवडणुकांच्या काळात दावेदारांकडे दोनच डोळे असतात, मात्र त्यांना हजारो डोळे पाहत असतात. त्यामुळे सर्वांनी पक्षाला आपले समजून काम केले पाहिजे. प्रत्येक नेत्याला आपल्या अंतर्गत येणाºया किमान पाच ‘बूथ’ची इत्थंभूत माहिती पाहिजे. जर नेता व्हायचे असेल तर ‘बूथ’वरदेखील काम केलेच पाहिजे व तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन जे.पी.नड्डा यांनी केले.५४ दिवसात वाढले ६ कोटी सदस्यभाजपाच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या ११ कोटी होती. पक्षाने देशभरात सदस्यता मोहीम सुरु केली व ५४ दिवसात ही संख्या १७ कोटींवर गेली आहे, अशी माहिती जे.पी.नड्डा यांनी दिली. डावे पक्ष व भाजप हे दोनच पक्ष विचारसरणीवर चालत आहेत. इतर सर्व पक्षांमध्ये घराणेशाहीच सुरू असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कलम ३७० च्या आडून जम्मू-काश्मीरला देशापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू होता व कॉंग्रेसचे नेतेदेखील यात सहभागी होते, असा आरोपदेखील त्यांनी लावला.गडकरींना विश्वास, युती होणारविधानसभेसाठी भाजप सेना युती होईल असे वाटते. भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील. विदर्भात १०० टक्के जागांवर विजय मिळेल व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत राज्यात सरकार बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ सत्ता मिळविणे हे भाजपचे ध्येय नाही. राष्ट्र, समाज बदलायचे आहे. लोकशाहीला जिवंत ठेवायचे आहे, असेदेखील ते म्हणाले.भाजपमध्ये तिकीटवाटपासाठी कुठलाच ‘कोटा’ नाहीयावेळी नितीन गडकरी यांनी तिकीटवाटपादरम्यानच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व नाराजी यावर भाष्य केले. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या 'मोड'मध्ये असून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा दिसून येते. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांनी तिकिटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही. परंतु भाजपमध्ये तिकीट वाटपासाठी कुठलाही 'कोटा' नाही. कार्याचे मूल्यांकन होऊन तिकीट वाटप होईल. ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन गडकरी यांनी केले.गडकरींनी टोचले नेत्यांचे कानभाषणादरम्यान गडकरी यांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकीट मागणाऱ्या नेत्यांचे कानदेखील टोचले. काही खासदार, आमदार आपल्यामुळेच विजय मिळत असल्याच्या तोऱ्यात वावरतात. मात्र खरा विजय कार्यकर्त्यांमुळे होतो. विजयाचा अहंकार कुणीही करु नये. काही नेते मुलगा, पत्नीसाठी तिकीट मागतात. परंतु भाजपमध्ये अशी नातेवाईकांना थेट तिकीट मिळतच नाहीत. तसे नेत्याचा मुलगा किंवा नातेवाईक असणे गुन्हा नाही. मात्र अशी मागणी जनतेने केली तरच कुटुंबीयांना तिकीट देण्याबाबत विचार होऊ शकतो, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण