शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील थरारकांड; क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरकडून सटोड्याची हत्या

By नरेश डोंगरे | Updated: June 5, 2023 19:01 IST

Nagpur News क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची रक्कम वसुल करण्यासाठी  एका व्यक्तीची हत्या करून बुकी तसेच त्याच्या साथीदारांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून मृतकाच्या दुचाकीला बांधून ही दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली.

नरेश डोंगरे नागपूर : क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची रक्कम वसुल करण्यासाठी  एका व्यक्तीची हत्या करून बुकी तसेच त्याच्या साथीदारांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून मृतकाच्या दुचाकीला बांधून ही दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली. आरोपींना नागपूरच्या रेल्वेस्थानकावर अटक केल्यानंतर भिलाई (छत्तीसगड)मधील या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला.ओमप्रकाश साहू असे मृताचे तर आशिष सूर्यप्रताप तिवारी (वय ३४, रा. साकिन, जामुल,छत्तीसगड), अंकू उर्फ रजनीश पांडे (वय ३०, रा. सेक्टर ११, दुर्ग) तसेच लाला उर्फ अनुज सिताशरण तिवारी (वय१९, रा. दुर्ग, छत्तीसगड) अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष तिवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो बुकी असल्याचे समजते. तर, अंकू पांडे आणि लाला तिवारी हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी सुपारी घेऊन हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले.

मृतक साहू हासुद्धा गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याला क्रिकेट बेटिंगचेही व्यसन होते. बुकी आशिष तिवारीची साहूसोबत ओळख होती. आयपीएलच्या सामन्यानंतर तिवारीचेे वैमनस्य आले. साहू पैसे देत नसल्यामुळे तिवारीने भाडोत्री गुन्हेगार अंकू पांडे आणि लाला तिवारीला सोबत घेतले. ३१ मे च्या रात्री आशिष, अंकू आणि लाला या तिघांनी साहूचे अपहरण केले. मध्यरात्री साहूची पत्नी विमला हिला फोन करून या अपहरणाची माहिती देऊन सट्टेबाजीच्या ३० लाखांची मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास किंवा पोलिसांना माहिती दिल्यास साहूचा मृतदेह घरी पाठवून देऊ अशी आरोपींनी धमकीही दिली. १ जूनला विमला साहूने भिलाई ठाण्यात तक्रार नोंदवली. तत्पूर्वीच आरोपींनी साहूची गळा दाबून हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे आरीने तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून ते साहूच्या दुचाकीला बांधले आणि ती दुचाकी खदानीच्या पाण्यात फेकून दिली.

दरम्यान, तक्रार दाखल होताच छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयीत आरोपी आशिष तिवारीला अटक केली. फरार आरोपी नागपूरकडे पळाल्याचे कळताच येथील रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) सिनियर कमांडंट आशुतोष पांडे यांच्याशी भिलाई  पोलिसांनी संपर्क केला. पांडे यांनी आरपीएफच्या क्राइम इंटेलिजन्स ब्युरो (सीआयबी)चे पोलीस निरीक्षक आर. एल. मिना, नवीन प्रताप सिंग आणि त्यांच्या पथकाला कामी लावून ३ जूनला आरोपी अंकू पांडे आणि लाला तिवारीला नागपूर रेल्वेस्थानकाबाहेर सिनेस्टाईल अटक केली. ही माहिती मिळाल्यानंतर दुर्गचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी आपले पथक पाठवून नागपूर आरपीएफकडून या दोघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी