वर्धा मार्गावर मद्यधुंद कंटेनरचालकाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST2021-08-21T04:13:25+5:302021-08-21T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मद्यधुंद कंटेनरचालकाने शुक्रवारी रात्री वर्धा मार्गावर प्रचंड थरार निर्माण केला. वेगात वेडावाकडा कंटेनर चालवून ...

Thrill of drunk container driver on Wardha road | वर्धा मार्गावर मद्यधुंद कंटेनरचालकाचा थरार

वर्धा मार्गावर मद्यधुंद कंटेनरचालकाचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मद्यधुंद कंटेनरचालकाने शुक्रवारी रात्री वर्धा मार्गावर प्रचंड थरार निर्माण केला. वेगात वेडावाकडा कंटेनर चालवून त्याने अनेक वाहनांना कट मारला. संतप्त वाहनचालकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याची बेदम धुलाई करून त्याला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास एक कंटेनर चालक छत्रपती चाैकातून बेदरकारपणे कंटेनर चालवत होता. समोर दिसणाऱ्या अनेक वाहनांना त्याने कट मारला. त्यामुळे वर्धा मार्गावर एकच थरार निर्माण झाला. तो दारूच्या नशेत असावा आणि समोर मोठा अपघात करू शकतो, हे ध्यानात आल्याने एकाने पोलिसांना फोनवरून कळवले तर काही धाडसी वाहनचालकाने त्याचा पाठलाग करून त्याला हॉटेल प्राईडजवळ पकडले. तेथे त्याला थांबवून वाहनाच्या बाहेर खेचले. त्याची संतप्त जमावाने बेदम धुलाई केली. दरम्यान, वर्दळीच्या या मार्गावर मोठी गर्दी जमल्याने तेथे तणाव निर्माण झाला होता. बाजुलाच असलेले सोनेगाव पोलीस तेथे पोहचले. त्यानंतर जमावाने आरोपी चालकाला पोलिसांच्या हवाली केले. आरोपी कंटेनरचालकाचे नाव वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. अपघातात कुणी जखमी झाले नसल्याचे पोलीस सांगत होते.

----

Web Title: Thrill of drunk container driver on Wardha road