वादळामुळे तीन रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST2020-11-28T04:12:29+5:302020-11-28T04:12:29+5:30

नागपूर : रेल्वे प्रशासनाने चेन्नईकडे आलेल्या वादळामुळे नागपूर विभागातून जाणाऱ्या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने ...

Three trains canceled due to storm | वादळामुळे तीन रेल्वेगाड्या रद्द

वादळामुळे तीन रेल्वेगाड्या रद्द

नागपूर : रेल्वे प्रशासनाने चेन्नईकडे आलेल्या वादळामुळे नागपूर विभागातून जाणाऱ्या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०६०११ कन्याकुमारी-निजामुद्दीन एक्स्प्रेस २५ नोव्हेंबरला सुटणारी गाडी रद्द केली आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०६०१२ निजामुद्दीन-कन्याकुमारी ही २८ नोव्हेंबरला सुटणारी गाडी रद्द केली आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०५११९ रामेश्वरम-मंडुआदिह एक्स्प्रेस ही २५ नोव्हेंबरला सुटणारी गाडी रद्द केली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

...............

Web Title: Three trains canceled due to storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.