भरधाव ट्रेलरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 20, 2014 01:07 IST2014-08-20T01:07:17+5:302014-08-20T01:07:17+5:30

भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा घटनारस्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील

Three people die in the trailer crash | भरधाव ट्रेलरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

दुचाकीला धडक : बुटीबोरी - टाकळघाट मार्गावरील घटना
टाकळघाट : भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा घटनारस्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील बुटीबोरी - टाकळघाट मार्गावर मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.
अमोल बंडू घोडे (२५, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा), गजानन चाफले (२४, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा) व शत्रुघ्न सुरेश चौधरी (२८, रा. कवठा, जिल्हा नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही एमएच-४०/एक्स-०८५२ क्रमांकाच्या मोटरसायकलने बुटीबोरीहून टाकळघाटकडे जात होते. दरम्यान, बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील शिल्पा कंपनीसमोर भरधाव येणाऱ्या ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेही दूरवर फेकल्या गेले.
यात गंभीर जखमी झाल्याने या तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रेलरचालक ट्रेलरसह पळून गेला. परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची सूचना बुटीबोरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सदर ट्रेलरचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यात यश आले नाही. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. बुटीबोरी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)

Web Title: Three people die in the trailer crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.