शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 17:58 IST

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

नागपूर : थकीत बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी  जलसंधारण विभागातील तीन बड्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. 

कविजीत पाटील (३२), जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि कार्यवाहक प्रादेशिक संवर्धन अधिकारी (नागपूर), श्रावण शेंडे (४६),  उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी वर्ग-१ (चंद्रपूर) आणि रोहित गौतम (वय-३५) विभागीय लेखा अधिकारी (चंद्रपूर) अशी आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार नागपूरच्या ४६ वर्षीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले होते. व त्याच्या देयकांची बिले सादर केली होती. सदर कामाच्या बिलाची व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरता तिन्ही अधिकाऱ्यांनी ८१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० लाख देण्याचे ठरले. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

यानंतर मंगळवारी सापळा रचून शेंडे याला तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडण्यात आले. पाटील आणि गौतम यांच्यावतीने शेंडे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणnagpurनागपूरchandrapur-acचंद्रपूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग