नागपूर : जिथे मृत्यूच्या सावल्या दाटून आल्या होत्या, तिथे जीवनाची नवी पालवी उमलली. अवघे ५५० ग्रॅम वजनाचे बाळ, तीन महिने मृत्यूशी झुंज देत अखेर जीवनाच्या कुशीत परतले. या बाळासह कमी वजनाच्या, ७४० व ८०० ग्रॅम वजनाच्या दोन बाळावर शर्थीचे उपचार करीत नवे आयुष्य दिले. मेडिकलमधील नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या अथक सेवेमुळे हे शक्य झाले. या तिन्ही नवजात बाळांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी खुद्द अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह सर्व डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते. आपल्या लेकरांना कुशीत घेऊन निघालेल्या मातांच्या चेहºयावरील कृतज्ञतेचे भाव रुग्णालयाच्या नि:स्वार्थ सेवेची साक्ष देत होते.
‘एनआयसीयू’चे प्रभारी प्रा. डॉ. आशिष लोठे यांनी सांगितले, वेळेपूर्वीच जन्माला आलेल्या बाळाचे वजन ५५० ग्रॅम एवढे कमी होते. जन्मानंतर लगेच त्याला गंभीर फुफ्फुसाचा आजार (हायालीन मेंब्रेन डिसीज) आणि अत्यंत गंभीर जीवघेण्या आतड्यांचा आजार (नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस) झाला. त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले. शिवाय, एका मशीनद्वारे सतत ठराविक दाब असलेली हवा नाकावाटे किंवा तोंडावाटे देण्यात आली. हा उचपार दोन-तीन आठवडे नव्हे तर तब्बल तीन महिने चालले. ‘एनआयसीयू’च्या या अविरत काळजीनंतर, बाळाचे १६०० ग्रॅम वजन झाले. एवढ्या कमी वजनाच्या बाळाला नवे आयुष्य देणारी शासकीय रुग्णालयातील ही पहिलीच घटना आहे. प्रेमापोटी परिचारिकांनी डिस्चार्जपूर्वी तिचे नामकरण समारंभ देखील केला.
७४० ग्रॅमचा बालक संकटातून सुखरूप
बालरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मनीष तिवारी यांनी ७४० ग्रॅम वजनाच्या दुसºया बाळाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, या बाळावर दोन महिने उपचार चालले. ‘अति-प्रिमॅच्युरिटी’ आणि प्रदीर्घ व्हेंटिलेशनमुळे गुंतागुंत वाढली होती. ‘रेटिनोपॅथी आॅफ प्रिमॅच्युरिटी’वरही उपचार करण्यात आले. शर्थीच्या उपचारानंतर, त्याचा जीव वाचविला, सोबतच त्याचे १६६० ग्रॅम वजन झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
८०० ग्रॅमच्या कन्येची अनेक आजारांविरुद्ध झुंज
‘एनआयसीयू’चे सहायक प्राध्यापक डॉ. संदीप मानवटकर यांनी तिसºया बाळाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, ८०० ग्रॅम वजनाच्या बायाला ‘फुल्मिनंट सेप्टिसेमिया’, मोठे ‘पेटन्ट डक्टस आर्टिरिओससंमुळे पल्मोनरी प्लेथोरा, ‘एनइसी’ आणि ‘ब्रॉन्कोपल्मोनरी डिसप्लेसिया’अशा आजाराशी बालकाने झुंज दिली. तिला दूध पाजण्यातही अनेक अडचणी आल्या. तब्बल ६४ दिवसांच्या उपचारानंतर ती धोक्याबाहेर आली. रुग्णालयातून डिस्चार्ज देताना तिचे वजन १६८० ग्रॅम झाले होते.
या डॉक्टर, परिचारिकांच्या परिश्रमाला यश
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकारात डॉ. तिवारी, डॉ. लोठे, डॉ. मानवटकर यांच्यासह निवासी डॉक्टर डॉ. अंजिनी, डॉ. सोनिया, डॉ. प्रियांका, डॉ. चरण, डॉ. आश्मा, डॉ. आदित्य आणि समर्पित परिचारिका आरती आत्राम, सुरेखा, तक्षा, तृप्ती, जयश्री, स्नेहा, प्रिती यांचा अविरत परिश्रमामुळे अनेक 'टिनी फायटर्स' आज नवीन जीवन जगत आहेत.
Web Summary : Nagpur doctors miraculously saved three premature babies, weighing as little as 550 grams, through intensive care. After months of dedicated treatment at the NICU, the infants, battling severe complications, were discharged healthy, bringing immense joy to their families and hospital staff.
Web Summary : नागपुर के डॉक्टरों ने 550 ग्राम वजन वाले तीन समय से पहले जन्मे शिशुओं को गहन देखभाल के माध्यम से चमत्कारिक रूप से बचाया। एनआईसीयू में महीनों के समर्पित उपचार के बाद, गंभीर जटिलताओं से जूझ रहे शिशुओं को स्वस्थ छुट्टी दे दी गई, जिससे उनके परिवारों और अस्पताल के कर्मचारियों को बहुत खुशी हुई।