शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

नागपुरात कडवविरुद्ध आणखी तीन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:35 AM

गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचारपूस केली. उद्या आणखी काही जण गुन्हे शाखेत हजेरी लावणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचारपूस केली. उद्या आणखी काही जण गुन्हे शाखेत हजेरी लावणार आहेत.मंगेश कडवच्या भरतनगरातील कार्यालयात पोलिसांना दोन पोती कागदपत्रे आणि फाईल्स मिळाल्या. त्यात कडवच्या संपर्कातील अनेकांची नावे आहेत. काही स्टॅम्पवर लिहिलेल्या करारनाम्यात कडवचे भागीदार म्हणून काही व्यक्तींची नावे आहेत. अशा तिघांना आज गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत चौकशी केली. या चौकशीतून काय पुढे आले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या तिघांना आणि आणखी काही जणांना मंगळवारी पोलिसांनी गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविल्याची सूत्रांची माहिती आहे.गुन्हे शाखेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांची आज चौकशी झाली त्यातील तिघांनीही त्याच्यासोबत भागीदारी असल्याचा इन्कार केला. उलट कडवने आमच्यासोबतही फसवणूक केल्याचा आरोप लावल्याची माहिती आहे.आमची रक्कम हडप केली आणि परत मागितल्यानंतर आम्हालाही धमक्या दिल्या, असे या तिघांनी म्हटल्याचे समजते. पोलीस या तिघांच्या बयानाची शहानिशा करीत आहेत.दरम्यान, आज आणखी तिघे तक्रारदार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे आले. आमचीही कडवने फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी गुन्हे शाखेत केल्याचे समजते. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांना परिमंडळ-१च्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.आणखी होणार गुन्हे दाखलकडव याने शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. त्यातील सहा तक्रारींची शहानिशा झाली. त्यामुळे सहा गुन्हे दाखल झाले असून, लवकरच आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी