Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात लवकरच तीन कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 08:00 IST2021-04-27T08:00:00+5:302021-04-27T08:00:11+5:30
Coronavirus in Nagpur कोरोना रुग्ण नागपुरात उपचारासाठी आणले जात आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील भार वाढला आहे. याचा विचार करता महापालिका शहरात पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे.

Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात लवकरच तीन कोविड केअर सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण नागपुरात उपचारासाठी आणले जात आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील भार वाढला आहे. याचा विचार करता महापालिका शहरात पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात न्यायालयानेही निर्देश दिले आहे. याचा विचार करता मनपाने तीन केअर सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे.
वाठोडा परिसरातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील रिक्रिएशन हॉल, गांधीबाग येथील अग्रसेन भवन व रविनगर येथील अग्रसेन भवन आदी ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.
गतीने काम होण्याची गरज
मनपा प्रशासनाच्या ढिसाळ व संथ कारभारामुळे कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे.