लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमतरतेचा फटका आधीच बसत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सला आता दाट धुक्याचाही फटका बसत आहे. विशेष म्हणजे बुधवारी इतर कोणत्याही एअरलाइन्सची एकही फ्लाइट रद्द झाली नाही किंवा त्यांना विलंब झाला नाही. मात्र, गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणाऱ्या : कथित वैमानिकांच्या इंडिगोची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली असून आठ उड्डाणांना विलंब झाला.
गेल्या चार दिवसांपासून देशाची राजधानी दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीसह दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. बुधवारी नागपूर ते दिल्ली मार्गावरील इंडिगोची फ्लाइट विलंबाने पोहोचली. मागील दोन दिवसांपासून सतत रद्द होत असलेली नागपूर ते दिल्ली दरम्यानची एअर इंडियाची फ्लाइट मात्र बुधवारी वेळेवर प्रवाशांसह रवाना झाली.
मात्र, दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या अनेक उड्डाणांना तासाभरापेक्षा अधिक विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. केवळ दिल्लीच नव्हे, तर मुंबई आणि इंदूर मार्गावरील फ्लाइट्सही उशिराने उडाल्या.
विलंबित उड्डाणे
- दिल्ली-नागपूर (६ए-६६९६) १.१५ मिनिटे
- दिल्ली-नागपूर (६३-६५३०) ४० मिनिटे
- मुंबई-नागपूर (६३-६२३५) २५ मिनिटे
- इंदूर-नागपूर (६३-७०३७) १ तास
- नागपूर-दिल्ली (६३-६६२०) १:१० मिनिटे
- नागपूर-दिल्ली (६३-६६२७) १:१५ मिनिटे
- नागपूर-मुंबई (६३-६५९) ५० मिनिटे
- नागपूर-इंदूर (६३-७२७३) ५० मिनिटे
रद्द करण्यात आलेली उड्डाणे
- ६८०२ / १५७ : दिल्ली-नागपूर-दिल्ली
- २७३८/२७३९ : मुंबई-नागपूर-मुंबई
- २४४७/८१२ : पुणे-नागपूर-कोलकाता
Web Summary : Indigo flights faced cancellations and delays at Nagpur airport due to fog. Three flights were canceled, and eight were delayed, causing significant passenger inconvenience. Other airlines operated smoothly, highlighting Indigo's particular struggle with the weather conditions. Delhi, Mumbai, and Indore routes were affected.
Web Summary : नागपुर हवाई अड्डे पर कोहरे के कारण इंडिगो की उड़ानें रद्द और विलंबित हुईं। तीन उड़ानें रद्द कर दी गईं, और आठ में देरी हुई, जिससे यात्रियों को भारी असुविधा हुई। अन्य एयरलाइनों ने सुचारू रूप से संचालन किया, जो मौसम की स्थिति के साथ इंडिगो के विशेष संघर्ष को उजागर करता है। दिल्ली, मुंबई और इंदौर मार्ग प्रभावित हुए।