नागपुरात नवविवाहित महिलेसह तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 02:00 IST2020-09-01T01:58:41+5:302020-09-01T02:00:48+5:30
शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात एका नवविवाहित महिलेचाही समावेश आहे.

नागपुरात नवविवाहित महिलेसह तिघांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात एका नवविवाहित महिलेचाही समावेश आहे.
पायल निशांत बाथो (वय २४) असे नवविवाहित महिलेचे नाव आहे. ती तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंसापुरी छोटी खदान भागात राहायची. तिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिचा पती खासगी काम करतो. कोरोनामुळे व्यवस्थित रोजगार मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी वाढली होती. त्यात पतीला दारूचे व्यसन लागल्याने पती-पत्नीत वाद होत होते. त्यातून नैराश्य आल्यामुळे पायलने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीवरून, तहसील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुकेश गगन पुरी (वय ३५) यांनी रविवारी सायंकाळी गळफास लावून घेतला. त्यांचा लहान भाऊ दिनेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी घटना मानकापूरच्या बाबा बगदादिया नगरात घडली. अमरीन शहानवाज कुरेशी (वय ३०) यांनी गळफास लावून घेतला. रविवारी सकाळी ११.२० वाजता ही घटना उघडकीस आली. शहानवाज अब्दुल रज्जाक कुरेशी यांनी दिलेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.