शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'फ्रेंडशीप डे' सेलिब्रेशन जीवावर बेतले, तलावात बुडून तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 21:22 IST

देशात आज सर्वत्र फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन एकमेकांना संदेश पाठवत ‘फ्रेंडशीप डे’ला मित्रांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नागपूर : देशभर फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन एकमेकांना संदेश पाठवत ‘फ्रेंडशीप डे’ला मित्रांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने हिंगण्यातील सालईमेंढा परिसरावर शोककळा पसरली आहे. 

फ्रेंडशीप डे निमित्त तरुणांसह विद्यार्थ्यांकडून आनंंदोत्सव साजरा केला जातो. तर, काही जण पिकनिकचाही प्लॅन करतात. नागपूर शहरातील काही विद्यार्थी रविवारी सायंकाळी पिकनिकच्या निमित्ताने हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावाजवळ आले होते. त्यातील तिघांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते तलावात उतरले आणि खोल पाण्यात गेल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून, दोघांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धांत सिडाम (१७, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड, नागपूर), सागर सुरेश जांबुळकर (१७, रा. भांडेप्लाट, सेवादलनगर, नागपूर व बंटी प्रेमलाल निर्मल (१४, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांसह त्यांचे अन्य पाच मित्र फ्रेंडशीप डे निमित्त हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात तलावाजवळ फिरायला आले होते. दरम्यान, या तिघांना पोहण्याचा मोह झाला आणि ते तलावात उतरले. उर्वरित पाच जण काठावर उभे होते. पाहता पाहता तिघेही खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले.

टॅग्स :Friendship Dayफ्रेण्डशीप डेWaterपाणीDeathमृत्यू