नागपुरातील फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:15 IST2018-02-03T11:15:16+5:302018-02-03T11:15:31+5:30
नागपुरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या पती, पत्नी व त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह फुटाळा तलावात आढळला आहे.

नागपुरातील फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या
नागपूर: नागपुरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या पती, पत्नी व त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह फुटाळा तलावात आढळला आहे. या तिघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश शिंदे (३५), रुपाली शिंदे (३२) आणि नाहली शिंदे (५) या तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शनिवारी सकाळी तलावाबाहेर काढले. शुक्रवारी रात्री शिंदे कुटुंबीय जवळ असलेल्या फुटाळा तलावाजवळ फिरायला गेले.
काही वेळ फिरल्यानंतर निलेश आणि रूपालीनं निहलीसह तलावात उडी घेतली. मात्र, रात्रीची वेळ असल्यानं कोणाला या तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समजू शकलेली नाही. शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी तीनही मृतदेह तलावात तरंगताना दिसते. तलावाजवळ असलेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबतची तातडीनं माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांनीही आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.