शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: July 31, 2014 01:09 IST

नवनिर्मित कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेल्या मुलासह एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील पांडेगाव येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या

पिता-पुत्राचा समावेश : पांडेगाव येथे शोककळासाळवा : नवनिर्मित कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेल्या मुलासह एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील पांडेगाव येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या कोल्हापुरी बंधाऱ्याचे याच उन्हाळ्यात काम झाले, हे विशेष!अरुण परसराम धनजोडे (४५) असे वडिलाचे तर त्याचा मुलगा ऋतुपाल अरुण धनजोडे (१४) आणि पुतण्या भारत अशोक धनजोडे (१३) तिघेही रा. पांडेगाव अशी मृतांची नावे आहेत. शेतात काम करीत असलेल्या वडिलांची शिदोरी घेऊन जात असलेल्या ऋतुपालसह भारतही शेतात जाण्यासाठी निघाला. शिदोरी दिल्यानंतर ते दोघेही शेताच्या बाजूला असलेल्या नवनिर्मित बंधाऱ्याकडे गेले. तेथे ऋतुपालचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना भारतही पाण्यात पडला. बराच वेळ होऊनही मुले परत न आल्याने अरुण हा बंधाऱ्याकडे गेला असता पाण्यातून बुडबूड असा आवाज ऐकू आला. त्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात दोघेही पडल्याचे दिसून आले. त्याने त्या दोघांना वाचविण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकली. मात्र त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही. त्यानंतर दुपट्टा फेकून वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्यात त्याचाही तोल जाऊन तो पाण्यात बुडाला. सायंकाळ होऊनही तिघेही घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु, ते तिघेही कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोधाशोध केल्यावर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भारत आणि अरुणचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यात आढळला. त्यानंतर दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. गुरुवारी सकाळी पुन्हा घटनास्थळी शोध घेतल्यावर ६ वाजताच्या सुमारास ऋतुपालचा मृतदेह मिळाला. उत्तरीय तपासणीनंतर तिघांवरही पांडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यूनागपूर : बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेणा नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. फिरोज ऊर्फ प्रीतम संतोष लक्षीणे (२८, रा. बुटीबोरी) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रात आढळून आला. याबाबत बुटीबोरी पोलिसांना सूचना मिळताच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. (प्रतिनिधी)आधार गेला!पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांपैकी अरुण हा घरातील कर्ता पुरुष होता. त्याला ऋतुपाल हा एकुलता एक मुलगा होता. घरातील दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आधारच गेला. तर भारतचा मोठा भाऊ हा मानसिक रुग्ण असून त्याच्याकडून कुटुंबीयांच्या आशा होत्या. तोसुद्धा कुटुंबासाठी आधार होता. परंतु, या घटनेत त्याचाही मृत्यू झाला. मृतापैकी भारत हा साळवा येथील चैतन्यश्वर विद्यालयाचा सहावीचा तर ऋतुपाल हा साळवा येथीलच कै. दामोदरराव खापर्डे विद्यालयाचा सातवीचा विद्यार्थी होता.