शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रस्त्यावरील अपघातात तिघांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:36 IST

रस्ता अपघातात युवकासह तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देविविध ठिकाणी झाले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ता अपघातात युवकासह तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. पहिली घटना मंगळवारी रात्री हिंगण्यात घडली. विनोद वशिष्ठ सिंह (४८) हावडा, पश्चिम बंगाल, असे मृताचे नाव आहे. ते हिंगणा येथील डांबर प्लान्टमध्ये प्रभारी पदावर कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते प्लान्टचे वाहन महिंद्रा एम. एच. ४०, ए. के. ७३१२ मध्ये देवळी पेंढरी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजता परत येताना ते चालक रवी मिश्रा यांच्या शेजारी बसले होते. वाहनात प्लान्टमधील कर्मचारी गणेशकुमार साहु (२७) रा. सोनारी, झारखंड हा होता. आमगाव देवळी मार्गावर रवी मिश्रा याने बेजबाबदारणाने वाहन चालवून झाडाला धडक दिली. रविच्या शेजारी बसलेले सिंह यांचा यात जागीच मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी रवि मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना ८ फेब्रुवारीला रात्री कोराडीच्या गुमथळात घडली. गुमथळा येथील रहिवासी गणपत पांडुरंग चौरागडे (४५) हे दुचाकीने गुमथळाला जात होते. जेआयटी कॉलेजजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. चौरागडे यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना मंगळवारी रात्री घडली. साईनगर, हुडकेश्वर रोड येथील रहिवासी विकास दीपक जांगडे (३५) रात्री १ वाजता दुचाकीने घरी परत जात होते. घराजवळ ते दुचाकीवरून खाली पडले. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू