पूर्व विदर्भात पावसाचा तीन दिवसाचा येलो अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST2021-08-25T04:12:34+5:302021-08-25T04:12:34+5:30
नागपूर : दोन दिवसापासून वातावरणाचा नूर बदलला आहे. कालपर्यंत हलक्या पावसाचा अंदाजही व्यक्त होत असतानाच हवामान विभागाने पूर्व विदर्भामध्ये ...

पूर्व विदर्भात पावसाचा तीन दिवसाचा येलो अलर्ट
नागपूर : दोन दिवसापासून वातावरणाचा नूर बदलला आहे. कालपर्यंत हलक्या पावसाचा अंदाजही व्यक्त होत असतानाच हवामान विभागाने पूर्व विदर्भामध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे.
नागपुरात दोन दिवसापासून ढगाळी वातावरण आहे. चार दिवसाच्या सुटीनंतर सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही काळ वातावरण थंडावले असले तरी रात्रीनंतर वातावरणात उकाडा जाणवत होता. मंगळवारीही दिवसभर ढगाळलेले वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही भागात तुरळक पाऊस आला.
नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने नागपूूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान येलो अलर्ट देऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
...
ऑगस्टमधील पाऊस सरासरीच्या निम्माच
अद्यापही पावसाने ऑगस्ट महिन्यातील सरासरी गाठलेली नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेच आहेत. ऑगस्टमधील सरासरी पाऊस २०८.७ मिमी असला तरी २३ तारखेपर्यंत फक्त ११८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या निम्मा पाऊस पडायचा असून महिना संपायला फक्त आठवडा उरला आहे.
...