इमारत देखभालीवर तीन कोटींचा खर्च?
By Admin | Updated: May 12, 2014 00:30 IST2014-05-12T00:30:30+5:302014-05-12T00:30:30+5:30
जिल्हा परिषदेच्या इमारतींची देखभाल व दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. पुढील वर्षातही इमारतींची देखभाल व दुरुस्तीसाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. खरोखरच दरवर्षी

इमारत देखभालीवर तीन कोटींचा खर्च?
जिल्हा परिषद : सभागृह व समिती कक्षाची दरवर्षी दुरुस्ती
नागपूर : जिल्हा परिषदेच्या इमारतींची देखभाल व दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. पुढील वर्षातही इमारतींची देखभाल व दुरुस्तीसाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. खरोखरच दरवर्षी या खर्चाची गरज आहे का, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. खेडकर सभागृह व समिती कक्षाचे नुकतेच नूतनीकरण केले आहे. यावर २० लाख रु. खर्च करण्यात आले. यात बैठक व्यवस्थेचेही नूतनीकरण केले आहे. वित्त वर्षात पुन्हा याच कामासाठी २३ लाखांची तरतूद केली आहे. जि.प.ची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या वर्षात ४० लाखांची तरतूद होती. याच कामासाठी पुन्हा ५५ लाखांची तरतूद केली आहे. जि.प.च्या मुख्य इमारतीची देखभाल व दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी १५ लाखांची तरतूद होती. यासाठी पुन्हा ३८ लाखांची तरतूद के ली आहे. विश्रामगृहांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १५ लाखांची तरतूद आहे. कर्मचार्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती व देखभालीसाठी गेल्या वर्षी २५ तर पुढील वर्षासाठी ३५ लाखांची तरतूद केली आहे. दरवर्षी तरतूद करूनही निवासांची अवस्था मात्र बिकट आहे. (प्रतिनिधी)