शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, वाहनचोरी करणारे तिघे गजाआड, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

By दयानंद पाईकराव | Updated: June 27, 2023 14:57 IST

गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कामगिरी

नागपूर : घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गजाआड करून त्यांच्या ताब्यातून ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोहित तुषार वालदे (वय १९, रा. फ्लॅट नं. २, श्री कॉम्प्लेक्स, यादवनगर), शेख नौशाद हारुन कुरेशी (वय २०, रा. वनदेवीनगर यशोधरानगर) आणि शेख सुल्तान शेख मोहम्मद (वय २३, रा. शहंशाह चौक, उप्पलवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लकडगंज परिसरात ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.३० ते १० मे २०२३ सकाळी ८.३० दरम्यान मोहम्मद शमीन अल्वर हुसेन (वय ५०, रा. जुनी मंगळवारी, लकडगंज) यांनी त्यांची लॉक करून ठेवलेली अ‍ॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, के-३७७६ अज्ञात आरोपीने चोरून नेली होती. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यासोबतच आरोपींनी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी तसेच कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे अ‍ॅल्यूमिनियमचे गंज चोरल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गंज व दोन दुचाकी असा एकुण ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक पोलिस निरीक्षक भोपाळे, आशिष कोहळे, प्रमोद वाघ, महादेव थोटे, राजुसिंग राठोड, रोनॉल्ड अ‍ॅन्थोनी, रामनरेश यादव, राजु टाकळकर, राजेंद्र टाकळीकर, सुशिल गवई, निखील जामगडे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकnagpurनागपूरPoliceपोलिसRobberyचोरीtheftचोरी