शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:55 IST

मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देमद्य विक्रेत्याची तक्रार : चार तोतया पोलीस गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद फैजल शकील पठाण, रौनक विठ्ठलराव निखारे (वय २६), आकाश ऊर्फ गौलू ताराचंद गौर (वय २२) आणि शेख नूर बब्बूभाई शेख (वय ५२) अशी त्यांची नावे आहेत.शेख नूर देशपांडे ले-आऊटमध्ये राहतो. उर्वरित तिघे श्रीनगर, नंदनवनमध्ये राहतात. यातील तक्रारकर्ते विष्णू धनराज अडवाणी (वय ५५) महालमधील बडकस चौकाजवळच्या नागोबा गल्लीमध्ये राहतात. त्यांचा नागपूर तसेच उमरेड मार्गावर वाईन शॉप आणि ढाबा आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कारवाईत अडवाणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फैजल, रौनक, आकाश आणि शेख नूर हे ५ मे च्या रात्री ८ वाजता अडवाणीच्या ढाब्यावर पोहचले. आम्ही मूल पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगून त्यांनी अडवाणींना अटक करण्याचा धाक दाखवला. अटक न करण्याच्या बदल्यात आरोपींनी ५ लाखांची मागणी केली. अटक टाळण्यासाठी अडवाणींनी ५ मे ते १५ जूनपर्यंत आरोपींना ३ लाख, ५५ हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी अडवाणींना पुन्हा एक लाख रुपये देण्यासाठी वेठीस धरले होते. ते वारंवार फोन करीत होते. त्यामुळे अडवाणींना संशय आला. त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार समाधान गीते यांनी कलम १७०, ३८४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपींनी ज्या मोबाईला वापर केला होता, त्या क्रमांकाच्या आधारे शुक्रवारी तिघांना तर आज आकाश गौर याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर