शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नागपुरात चोवीस तासात तीन अपघात : वृद्धासह तिघांचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:20 IST

गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.

ठळक मुद्देधंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.वर्धा मार्गावरील बाबा ट्रॅव्हल्सजवळ भरधाव ट्रक (एमएच ४०/ ६७४७) च्या आरोपी चालकाने प्रकाश पुंडलिकराव पांढरीपांडे (वय ६२) या अ‍ॅक्टिव्हाचालकाला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. पांढरीपांडे गजानननगरात राहत होते. आरोपी ट्रकचालकाने या अपघातानंतर पुन्हा एका दुचाकी आणि एका कारला धडक मारली. नंतर एका घराच्या कंपाऊंड वॉलवर धडकून ट्रक थांबला. त्यामुळे ती भिंतही तुटली. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाचा रोख लक्षात घेत आरोपी ट्रकचालक पळून गेला. ट्रकमध्ये सिलिंडर भरले होते. सुदैवाने वेळीच जमावातील काहींनी धोका ओळखून संतप्त नागरिकांची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला.दुसरा अपघात सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. वर्धा मार्गावरील पुष्कर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दीपाली प्रमोद काटोळे (वय ३८) आणि सपना अजय मून (वय ३३) या दोन मैत्रिणी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास अ‍ॅक्टिव्हाने जात होत्या. सोमलवाड्यातील कार्गो वळणावर भरधाव ट्रॅव्हल्सच्या (एमएच ४०/ वाय ६८८६) चालकाने सपना यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्या आणि दीपाली दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी सपना मून यांना मृत घोषित केले. सोनेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.३० ला अडाळी फाट्यावरही असाच जीवघेणा अपघात घडला. पारले फॅक्टरीत कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश कडू यांच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला भरधाव वाहनचालकाने धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत अपघातापूर्वी काम आटोपून घराकडे जात होते. याप्रकरणी रवी गुरुनाथ गमे (वय ३१, रा. वैभवनगर, दिघोरी) यांनी दिलेल्यात तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू