शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची पथकाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:57 AM

महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबतच परिसरातील लोकांनीही कारवाईला विरोध दर्शविल्याने अखेर पथक माघारी फिरले.

ठळक मुद्देमनपाचे अतिक्रमण पथक परतले : कुंजीलालपेठ येथील थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबतच परिसरातील लोकांनीही कारवाईला विरोध दर्शविल्याने अखेर पथक माघारी फिरले.शांताबाई थोरात यांनी घराचे बांधकाम क रताना सिवरेज लाईनच्या काही भागावर अतिक्रमण केले. १३ सप्टेंबर २०१७ रोजी याची तक्रार त्यांच्या शेजारी ज्योती गोडसुंदरे यांनी महापालिका कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर त्यांनी लोकशाही दिनातही तक्रार केली होती. यावर अतिक्रमण विरोधी पथकाने थोरात यांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्यास सांगितले. परंतु अतिक्रमण न हटविल्याने मंगळवारी धंतोली झोनचे पथक कारवाईसाठी पोहचले होते.या वस्तीतील अनेक लोकांनी सिवरेज लाईनवर अतिक्रमण केल्याची माहिती सचिन थोरात यांनी दिली. त्यामुळे कारवाई एकट्याच्या विरोधात का, असा सवाल त्याने पथकाला केला. अखेर पथकाने १५ दिवसाची मुदत देऊन व पथकाचा खर्च म्हणून पाच हजाराचा दंड वसूल करून पथक माघारी फिरले. प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, नितीन मंथनवार, संजय शिंगणे, जमशेद अली, शरद इरपाते यांच्यासह पोलीस पथक कारवाईत सहभागी झाले होते.पाच ट्रक साहित्य जप्तआशीनगर झोनच्या पथकाने यशोधरानगर परिसरातील टिपू सुलतान चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी या मार्गावरील १५ अतिक्रमण हटविले. पाच पानठेले, टायर्स विक्रेते, हॉटेल, चिकन विक्रे त्यांची दुकाने, किराणा दुकान, सायकल स्टोर्स यांच्यासह विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. येथून ट्रकभर साहित्य जप्त केले. दुसऱ्या  पथकाने गीतांजली टॉकीज परिसरातील शाहू पाणीपुरीचा ठेला व दोन ट्रक साहित्य जप्त केले. महाल झोनच्या पथकाने देवडिया स्कूल परिसरातील अतिक्रमणांचा सफाया केला.सिवरेज लाईनवर अतिक्रमणशहराच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणात सिवरेज लाईनवर अतिक्रमण करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत महापौरांनी सिवरेज लाईनवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर