शंभरकरने घेतली एक हजाराची लाच

By Admin | Updated: June 20, 2014 01:04 IST2014-06-20T01:04:57+5:302014-06-20T01:04:57+5:30

शेतीच्या लाभक्षेत्राचा अहवाल देण्यासाठी अशोक शंभरकर नामक कालवा निरीक्षकाने एक हजारांची लाच मागितली. लाच स्वीकारताच शंभरकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली.

Thousands took a hundred bribe bribe | शंभरकरने घेतली एक हजाराची लाच

शंभरकरने घेतली एक हजाराची लाच

एसीबीची कारवाई : पाटबंधारे विभागात खळबळ
नागपूर : शेतीच्या लाभक्षेत्राचा अहवाल देण्यासाठी अशोक शंभरकर नामक कालवा निरीक्षकाने एक हजारांची लाच मागितली. लाच स्वीकारताच शंभरकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. शंभरकर पाटबंधारे विभाग, वैनगंगा नगर, कार्यालय अजनी येथे कार्यरत आहे. या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ निर्माण झाली.
पिपळा डाकबंगला (ता. सावनेर) येथील नितीन काशिनाथ नरड (वय २८) यांच्या वडिलांची १३ एकर शेती आहे. त्या शेतीची दोन भावात वाटणी करायची होती. त्यातील ८ एकरांपेक्षा जास्त जमीन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अंतर्भूत असलेल्या जमिनीची खरेदी विक्री, वाटणीपत्र, बक्षिसपत्र किंवा गहाणपत्र करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची परवानगी आवश्यक असते. त्याकरिता उपजिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, वैनगंगानगर अजनी यांना पत्र पाठविण्यात आले. सदर शेती लाभक्षेत्रात येते की नाही, त्याचा अहवाल कळविण्याचे पत्रात नमूद होते. त्या अहवालाला विलंब होत असल्यामुळे तक्रारकर्ते नितीन नरड हे ९ जूनला पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेले. तेथे कालवा निरीक्षक अशोक शंभरकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा अहवाल पाठविण्यासाठी एक हजाराची लाच मागितली. नरड यांनी एसीबीकडे त्याची तक्रार केली. १८ जूनला या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणीची शहानिशा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी १२ च्या सुमारास नरड लाचेची रक्कम घेऊन शंभरकर यांच्याकडे गेले. शंभरकरने लाच स्वीकारताच एसीबीचे निरीक्षक अशोक साखरकर, हरीश रेड्डीवार, हवालदार विलास खणके, संतोष पुंडकर, सुभाष तानोडकर, चंद्रशेखर ढोक, दिनेश अदापुरे आदींनी शंभरकरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands took a hundred bribe bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.