शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

हजारो कर्मचाऱ्यांना मिळालेच नाही पोस्टल बॅलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:46 AM

निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी कर्मचाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांची ओरड : मतदानापासून वंचित राहण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी कर्मचाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहे.नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २२ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यातील १९,८४८ कर्मचाऱ्यांनी पहिल्या दोन प्रशिक्षणाच्या वेळी फार्म १२ भरून पोस्टल बॅलेटची मागणी केली. यात ९५८३ हे नागपूर तर १० हजार २६५ रामटेक लोकसभा मतदार संघातील कर्मचारी होते.विधानसभानिहाय निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवर पोस्टल बॅलेट जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही एक दिवस पोस्टल बॅलेट जमा करण्याची व्यवस्था केली होती. मात्र याची प्रसिद्धीच करण्यात आली नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना ते जमा करता आले नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे.सर्वांनाच पाठवले पोस्टल बॅलेट, ४१९४ अर्ज रद्द१९,८४८ कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केले. यातील ४१९४ अर्ज चुकीच्या माहितीमुळे रद्द करण्यात आले. नागपूरमधील १४६१ तर रामटेक लोकसभा मतदार संघातील २७३३ अर्ज रद्द झाले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले. चुकीचा पत्ता असल्याने आतापर्यंत ७१ कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट परत आले आहे. ज्यांचे पोस्टल बॅलेट चुकीच्या पत्त्यामुळे परत आले असतील ते नागपूर आणि रामटेक सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. येथून त्यांना बॅलेट घेऊन जाता येईल. मतमोजणी म्हणजे २३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे पोस्टल बॅलेट जमा करता येईल.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Employeeकर्मचारी