शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:32 IST

निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून ते मृताच्या वारसांना वितरीत करतील.

ठळक मुद्देभीषण अपघातात झाला होता मृत्यू : जिल्हाधिकारी करणार वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून ते मृताच्या वारसांना वितरीत करतील.पुंडलिक बालाजी बाहे (५६) रा. राहाटे ले-आऊट आणि नुकेश नारायण मेंढुले (३८) रा. भांडारकर ले-आऊट अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. मृत नुकेश मेंढुले हे अशोक कन्या विद्यालय उमरेड येथे तर पुंडलिक बाहे हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालय, साळवा कुही येथे शिक्षक होते. या दोघांसोबत विजय नामदेव बोहरूपी आणि नरेंद्र भास्कर पिपरे या दोन शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. मतदानाची प्रक्रिया पर पडल्यानंतर एकाच गावातील असल्याने मिळूनच परतीचा प्रवास करायचा असे त्यांनी ठरविले होते. रात्री उशिरापर्यंत निवडणूक प्रक्रिया चालली. प्रक्रिया आटोपल्यानंतर चारही शिक्षक एम. एच. १२ जी.एफ. ४५४७ या क्रमांकाच्या कारने हिंगणा येथून पहाटेच्या सुमारास उमरेडकडे रवाना झाले. नरेंद्र पिपरे हे वाहन चालवित होते. अशातच नागपूर येथून उमरेडच्या दिशेने येत असताना चांपा शिवारात अचानकपणे कार झाडावर आदळली. धडक एवढी जोरदार होती की, कारच्या समोरील भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला होता. यातच नुकेश मेंढुले जागीच ठार झाले. अन्य तिघांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. पुंडलिक बाहे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडणूक कर्तव्यावर असताना या दोघांचा मृत्यू झाल्याने शासनाने त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकEmployeeकर्मचारीAccidentअपघातDeathमृत्यू