शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
2
विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
3
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
4
Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
5
पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
6
मुलींना येतात 'दाढी-मिशा'; फक्त हार्मोन्समुळे नाही तर 'ही' आहेत कारण, WHO चे डॉक्टर म्हणतात...
7
'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!
8
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
9
पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
10
Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
11
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
12
मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
13
Vastu Shastra: 'या' सात वस्तू प्रत्येक श्रीमंत घरात हमखास सापडणारच; तुम्हीही घरी आणा!
14
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
15
महिलेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे हा विनयभंगाचा गुन्हा : उच्च न्यायालय
16
इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
17
इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
18
घर घेताना 'हा' खर्च कायम विसरून जातात लोक; नंतर होते मोठी डोकेदुखी, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
19
ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
20
मोदी अन् नितीश सरकारमधील मंत्री पगारासोबत पेन्शनही घेतात; RTI मधून खुलासा, ८ जणांची डबल कमाई
Daily Top 2Weekly Top 5

यंदा विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:08 IST

 सभापती-उपसभापतींनी घेतला अधिवेशन व्यवस्थेचा आढावा 

नागपूर :  हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात (विधानभवनात) होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.  प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनाबाबतच्या तयारीचा सकाळी आढावा घेण्यात आला. त्यावेळी अनावश्यक गर्दी टाळण्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहे.त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पाव्व्यक्तीने प्रवेश केला असेल तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा. शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. महिला आमदारांची निवास व्यवस्था, राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा, लिफ्ट, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता आदिंविषयी निर्देशही देण्यात आले.या बैठकीला विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव १), मेघना तळेकर (सचिव-२), डॉ. विलास आठवले (सचिव-३) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-४) यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.

- विमानांची गैरसोय, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती सध्या विमानांची गैरसोय आहे. अधिवेशनासाठी कोणत्याही सदस्यांना उशीर होऊ नये, त्यांची गैरसोय होऊन नये ते वेळेवर पोहोचावे यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. यासोबतच परत जाताना सुद्धा १४ तारखेला रात्री आणि १५ तारखेला विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची सूचना रेल्वे विभागाला करण्यात आली होती. ती रेल्वेने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Session: Vidhan Bhavan to Avoid Unnecessary Crowds, Administration Ready

Web Summary : Vidhan Bhavan to limit winter session crowds. VIP passes will have different colors. Administration reviewed facilities like accommodation, internet, security for members. Nodal officer appointed for flight delays; special trains arranged.
टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदRam Shindeराम शिंदेNeelam gorheनीलम गो-हेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन