नागपुरात  थर्टी फर्स्टचा तगडा बंदोबस्त : धुडगुस घालणाऱ्यांची तुरुंगात जाणार रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:06 PM2019-12-30T23:06:59+5:302019-12-30T23:09:33+5:30

जुन्या वर्षातील वादातून धुडगुस घालणाऱ्यांना नव्या वर्षाची सकाळ तुरुंगात काढावी लागू शकते. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली.

Thirty First's heavy bandobast in Nagpur | नागपुरात  थर्टी फर्स्टचा तगडा बंदोबस्त : धुडगुस घालणाऱ्यांची तुरुंगात जाणार रात्र

नागपुरात  थर्टी फर्स्टचा तगडा बंदोबस्त : धुडगुस घालणाऱ्यांची तुरुंगात जाणार रात्र

Next
ठळक मुद्दे४५०० पोलीस तैनात, हॉटेल्स-पबवर करडी नजर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जुन्या वर्षातील वादातून धुडगुस घालणाऱ्यांना नव्या वर्षाची सकाळ तुरुंगात काढावी लागू शकते. थटी फर्स्टला धुडगुस घालणाऱ्यांनी नागरिकांच्या जिविताला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचविल्यास किंवा छेडखानी केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली. 


मंगळवारी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उपराजधानी सजली आहे. हॉटेल्स, बार, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. येथे विदेशी बालांना बोलाविण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय युवकांनी देखिल विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले आहे. रात्रभर चालणाऱ्या या पार्ट्यांची पोलिसांनाही माहिती मिळणार अशी योजना आखली आहे. या पार्ट्यांमध्ये मादक पदार्थांचे सेवन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनांकडे पाहून पोलिसांनी सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त केला आहे. मॉल, फुटाळा तलाव, गर्दीची ठिकाणे तसेच सदर, धरमपेठ, शंकरनगरात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. छेडखानीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महिला पथक तैनात करण्यात आले आहेत. महिला साध्या वेषात गर्दीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणार आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाशिवाय ठाण्यातील पथकेही छेडखानी करणाºयांवर नजर ठेवणार आहेत. भांडणे आणि इतर बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी हॉटेल, पबवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या जल्लोषात असामाजिक तत्व जुन्या वैमनस्यातून भांडणे करतात. त्यामुळे गुन्हेगारांची सोमवारी रात्रीपासूनच धरपकड सुरु करण्यात आली आहे. जुगार, सट्टा आणि दारु विक्रीशी निगडीत गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहरात ७५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात येईल. १५० बीट मार्शल आणि गुन्हे शाखेचे १२ पथक शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालणार आहेत. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दलालाही तैनात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्तक राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी पोलीस आयुक्तांपासून शिपायापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून कडेकोट बंदोबस्त करणार आहेत.

Web Title: Thirty First's heavy bandobast in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.