मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच

By योगेश पांडे | Updated: September 7, 2023 17:20 IST2023-09-07T17:20:25+5:302023-09-07T17:20:55+5:30

दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडत तेथून दोन लाखांहून अधिक किमतीचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच लंपास केले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Thieves looted millions of smartphones and smartwatches while breaking into mobile shops | मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच

मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच

नागपूर : दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडत तेथून दोन लाखांहून अधिक किमतीचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच लंपास केले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अमरिश महेशचंद्र दवे (४०, पुरुषोत्तम बाजार चौक, बेलतरोडी) यांचे मोबाईलचे दुकान आहे. पाच सप्टेंबर रोजी ते रात्री अकरा वाजता दुकान बंद घरून घरी गेले. त्यानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुकानाची खिडकी तोडून आत शिरले. त्यांना दुकानात रोख रक्कम सापडली नाही.

१० स्मार्टफोन, १० स्मार्टवॉच व सहा घड्याळे असा २.०४ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दवे यांना हा प्रकार समजला. सीसीटीव्हीत दोन्ही चोरटे दिसून आले आहेत. दवे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Thieves looted millions of smartphones and smartwatches while breaking into mobile shops