चोरट्यांनी केला सराफा व्यापाऱ्यावर हल्ला : नागरिकांमध्ये खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:33 IST2020-11-26T00:32:22+5:302020-11-26T00:33:31+5:30

Thieves attack bullion trader, crime news खरबीतील साईबाबा नगरात लुटमारीला विरोध केल्यामुळे दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.

Thieves attack bullion trader: Sensation among citizens | चोरट्यांनी केला सराफा व्यापाऱ्यावर हल्ला : नागरिकांमध्ये खळबळ 

चोरट्यांनी केला सराफा व्यापाऱ्यावर हल्ला : नागरिकांमध्ये खळबळ 

ठळक मुद्देखरबीत दिवसाढवळ्या घडलेली घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : खरबीतील साईबाबा नगरात लुटमारीला विरोध केल्यामुळे दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.

भवानीनगर येथील रहिवासी पारुल थार्सेकर यांचे साईबाबा नगरात राजेश उमारे यांच्या घरी थार्सेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी ४.३० वाजता पारुल दुकानात काम करीत होते. त्याच वेळी २० ते २५ वयोगटातील दोन युवक दुकानात आले. त्यांनी काळा दुपट्टा बांधला होता. त्यांना ग्राहक समजून पारुल उभे झाले. दरम्यान एक युवक ‘चल निकाल चोर-चोर मत चिल्ला’ असे म्हणू लागला. पारुल यांना काही समजण्याच्या आतच युवकाने चाकू काढला. त्याने हल्ला करताच पारुलने हाताने चाकू पकडला. त्यांच्या हातातून रक्त निघत होते. पारुलची पकड सैल झाली. आरोपीने चाकूने पोटावर आणि हातावर वार केले. पारुलला दुकानाच्या बाहेर येताना पाहुन हल्लेखोर युवकाच्या साथीदाराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आपली सुटका करून पारुल दुकानातील टेबलवर उभे राहून ओरडत होते. पारुल यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. पकडल्या जाण्याच्या भीतीने आरोपी लुटमार न करताच फरार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली. याची माहिती मिळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात आरोपींचा तिसरा साथीदार अ‍ॅक्टिव्हावर असल्याची माहिती मिळाली. त्याच्या अ‍ॅक्टिव्हावर स्वार होऊन दोन्ही युवक फरार झाले. हवालदार अनिल येनुरकर यांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीवरून आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Thieves attack bullion trader: Sensation among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.