तिसरी चोरी करताना चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:51+5:302021-01-16T04:10:51+5:30

भिवापूर : मध्यरात्री दोन पानटपऱ्यांची दारे फोडत साहित्यासह रक्कमेवर हात साफ करणाऱ्या चोरट्याचा तिसरा प्रयत्न मात्र फसला. पेट्रोलिंग करणाऱ्या ...

The thief was arrested during the third robbery | तिसरी चोरी करताना चोरटा जेरबंद

तिसरी चोरी करताना चोरटा जेरबंद

भिवापूर : मध्यरात्री दोन पानटपऱ्यांची दारे फोडत साहित्यासह रक्कमेवर हात साफ करणाऱ्या चोरट्याचा तिसरा प्रयत्न मात्र फसला. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करत चोरट्याला जेरबंद केले. सुनील श्रीकृष्ण घरत (२४, रा. पिरावा, ता. उमरेड) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ११ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास एएसआय राजेंद्र डहाके व होमगार्ड बालु गोजे, कमलेश माहूरे शहरात सुमारास पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, आंभोरा रोड वरील गांधी किराना या दुकानाच्या शटरचा आवाज पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाच्या कानी पडला. त्यांनी वाहन थांबविले असता एक इसम अंधारलेल्या रस्त्याने सुसाट पळत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस व होमगार्ड यांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. सदर दुकानाची पाहणी केली असता शटर तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखविताच चोरट्याने या दुकाना‌लगत असलेल्या विलास भुते यांच्या पाणटपरीचे दार तोडून चिल्लर ३०० रुपयांवर हात साफ केल्याचे सांगितले शिवाय नक्षी रोडवरील अंकित नागोसे या तरुणाच्या पानटपरीचे दार तोडून ५०० रुपये रोख व साहित्यावर हात मारल्याचे चोरट्याने कबूल केले. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा नोंदवून त्यास १२ रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास एक दिवसाचा पीसीआर दिला. याप्रकरणी ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत रेवतकर पुढील तपास करत आहे.

जवळी येथे चोरी

तालुक्यातील जवळी येथेसुद्धा ११ जानेवारीला मध्यराञीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका घरातून १५ हजार रुपये किमतीच्या दागदागिन्यांसह रोख १ हजार रुपये रकमेवर हात साफ केला. वृंदा श्रीकृष्ण मोटघरे (५०, रा. जवळी) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल भगवानदास यादव करत आहे.

Web Title: The thief was arrested during the third robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.