चोरट्याने देशी-विदेशी मद्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:30+5:302020-12-06T04:07:30+5:30
नागपूर - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धान्यगंज चौकात असलेल्या एका वाईन शॉपमध्ये चोरटे शिरले. त्यांनी आतमधील देशी-विदेशी मद्य तसेच ...

चोरट्याने देशी-विदेशी मद्य पळविले
नागपूर - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धान्यगंज चौकात असलेल्या एका वाईन शॉपमध्ये चोरटे शिरले. त्यांनी आतमधील देशी-विदेशी मद्य तसेच रोख रक्कम लंपास केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
निखील बबनराव भोयर (वय ३१, रा. आजमशहा चौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वाईन शॉपच्या छताच्या टिना कापून चोरटे आतमध्ये शिरले. आतमधील देशी-विदेशी मद्य तसेच रोख १५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. जाता जाता चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कही पळवून नेली. भोयर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---
चोरट्यांची सावधगिरी
चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मद्याची चोरी केली. मात्र, चोरट्यांनी चोरी करताना कोणतीही नशा केली नसावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण आपली ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआर तर पळविलाच मात्र आजूबाजूच्या सीसीटीव्हीत आपण येऊ नये, याचीही काळजी घेतली.
----