असे आहेत मनपा शाळेतील हिरे !
By Admin | Updated: June 3, 2014 02:52 IST2014-06-03T02:52:43+5:302014-06-03T02:52:43+5:30
याच शाळेची विद्यार्थिनी तस्लीम कौसर हिने ७८.४६ टक्के गुण मिळवून मनपा

असे आहेत मनपा शाळेतील हिरे !
तस्लीम कौसर याच शाळेची विद्यार्थिनी तस्लीम कौसर हिने ७८.४६ टक्के गुण मिळवून मनपा शाळातून दुसरी आली. घरची परिस्थिती गरिबीचीच. वडील शेख आसीफ कुलीचे काम करतात. महिन्याला चार-पाच हजार मिळतात. यातून तीन मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. याही परिस्थितीत तस्लीम हिने यश मिळविले आहे. अंकित जाधव मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अंकित जाधव याने ६७ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेतून पहिला आला आहे. वडील राजेश जाधव स्पेअर पार्टच्या दुकानात काम करतात तर आई खासगी शाळेत चपराशी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही अंकित याने यश संपादन केले आहे. सपना डबडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना डबडे हिने ६६.६0 टक्के गुण मिळवून मनपाच्या विज्ञान शाखेतून दुसरी आली. वडील मनोहर डबडे मिस्त्रीचे काम करतात. महिन्याला सात-आठ हजार मिळतात. भाड्याच्या घरात राहूनही सपनाचा मोठा भाऊ इंजिनिअरिगला आहे. दुसरा भाऊ पॉलि करीत आहे. नियमित अभ्यास व मेहनत यातून यश मिळाले. पुढे इंजिनिअर होण्याचा मनोदय सपना डबडे हिने व्यक्त केला.