शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

कोळसा वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे लाईन टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 21:14 IST

महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेशा प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोराडी, खापरखेडा, चंद्रपूर , परळी वीजनिर्मिती केंद्रांना फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेशा प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील गरेपालमा सेक्टर २ येथून या केंद्रांना कोळसा पुरवला जाईल.छत्तीसगड सरकार, भारतीय रेल्वे आणि महानिर्मिती यांची संयुक्त एसपीव्ही तयार करण्यात आली. या प्रकल्पाच्या प्रकल्प-अहवालासाठी महानिर्मितीच्या वाट्याला ९६ लाख इतकी रक्कम येत असून या खर्चाला मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता औष्णिक विद्युत केंद्राना मुबलक कोळसा उपलब्ध होणे गरजेचे आहे. याकरिता ऊर्जा विभागाने पावले उचलत केंद्राकडून मिळालेल्या छत्तीसगड मधील गरेपालमा सेक्टर २ या कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाचा पर्याय निवडला आहे.छत्तीसगडमधील कटघोरा-डोंगरगड हा २७० किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्यात ४८२० कोटी खर्च करण्यात येणार असून त्यातील २६ टक्के आर्थिक भार महानिर्मितीच्या वाट्याला येणार आहे. कटघोरा -डोंगरगड नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी एस.पी.व्ही कंपनीमध्ये छत्तीसगड रेल कापोर्रेशन लि. आणि एसईसीएल यांच्या बरोबर भागीदार म्हणून महानिर्मितीने २६ टक्के भागभांडवल गुंतविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.महानिर्मिती कंपनीची एकूण औष्णिक विद्युत केंद्रांची स्थपित क्षमता १०३८० मे. वॅ. इतकी आहे.. त्यासाठी ४१.५८६ द.ल मे. टन कोळशाची प्रतिवर्षी आवश्यकता आहे. महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर संच क्र.८ व ९, कोराडी संच क्र. ८,९ व १० आणि परळी संच क्र. ८ विद्युत केंद्रामध्ये वापरात येणाऱ्या कोळशसाठी छत्तीसगड राज्यातील गरेपालमा सेक्टर २ ही कोळसा खाण भारत सरकारने २४ मार्च २०१५ रोजी मंजूर केली होती. या खाणीतून पुढील ३० वर्षासाठी कोळसा मिळणार आहे. सुरवातीला हा कोळसा झारसुगुडा- नागपूर ह्या रेल्वे मार्गावरून आणला जाणार होता. परंतु झारसुगुडा- राजनंदगांव हा रेल्वेमार्ग वाहतुकीने व्यस्त असतो, तसेच खनिज साठ्याच्या वाहतुकीमुळे भविष्यात राज्यातील विद्युत केंद्रांकरिता या मार्गाने कोळसा वाहतूक करणे अशक्य होणार होते. ही संभाव्य परिस्थिती व होणारी अडचण लक्षात घेऊन महानिर्मिती कंपनीने छत्तीसगड शासन, भारतीय रेल्वे व भूगर्भशास्त्र आणि खाण विभाग, छत्तीसगड मधील अधिकारी वर्ग ह्यांच्यासोबत विचारविनिमय केल्यानंतर, सध्या व्यस्त असलेल्या रेल्वेमार्गाला स्वतंत्र व समांतर रेल्वेमार्ग उपलब्ध करण्याचा पर्याय विचारात घेतला.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर