शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांवर दीर्घकालीन विपरीत परिणाम दिसून येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:31 IST

देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होताना दिसत आहे. जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर काही दिवस जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण होणार आहे. काही दिवसानंतरच उद्योगांवर विपरीत परिणाम दिसून येणार असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कोरोना महामारीत ऑर्डर मिळणे बंदउधारी देत नाहीत कॉर्पोरेट व पीएससी कंपन्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होताना दिसत आहे. जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर काही दिवस जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण होणार आहे. काही दिवसानंतरच उद्योगांवर विपरीत परिणाम दिसून येणार असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर जुन्या ऑर्डरच्या आधारे कंपन्या सुरू राहिल्या. बँकांनी २० टक्के भांडवल दिले. त्या आधारे मालकांनी कामगारांना पगार दिले, जुने देणे चुकते केले आणि कंपन्या सुरू केल्या. जुने ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आता नवीन ऑर्डर येणे बंद झाले आहे. देशातील पुरवठा साखळीच तुटली आहे. या अंतर्गत हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. सुरू असलेल्या कंपन्या पुढे बंद झाल्यास त्या पुन्हा सुरू होणे कठीण आहे. पूर्वीच मंदीत असलेली त्यामुळे नागपूरची अर्थव्यवस्था आणखी मंदीत येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.लॉकडाऊननंतर बंद असलेल्या कंपन्या सुरू करण्यास उद्योजकांना महत प्रयत्न करावे लागले संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करून कामगारांना मास्क वाटप करून तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन कारखाने सुरू झालेत. पण सध्या स्थिती चांगली नाही. अनेकांनी खर्चात वाढ होऊ नये म्हणून स्वत:हून कारखाने बंद केले आहेत. जीडीपीमध्ये २३ टक्क्यांची घसरण झाल्याचा अहवाल असताना नागपुरातही त्याचा काय परिणाम झाला असेल, यावर चिंतन करण्याची गरज आहे. याकरिता सरकारने उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उद्योजकांनी लोकमतशी बोलताना केली..कारखान्यात एखादा कामगार कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली जाते. दोन दिवस कारखाना बंद ठेवून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांची कोरोना चाचणी करून कारखाना सॅनिटाईज्ड करण्यात येतो. याशिवाय कुटुंबीयांचीही माहिती आरोग्य विभागाला देण्यात येते. याप्रकारे कामगारांची काळजी कारखानदार घेत असल्याचे उद्योजक म्हणाले. कोरोना रुग्ण आढळल्यानंतरही कारखान्यांची स्थिती खराब झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.कोरोना नव्हे तर अर्थपुरवठ्याअभावी कारखाने बंद होणारहिंगणा एमआयडीसीमध्ये सध्या जवळपास ७०० कारखाने सुरू आहेत. त्यापैकी अनेक कारखान्यांची स्थिती चांगली नाही. पुढील काही दिवसात कोरोनामुळे नव्हे तर अर्थपुरवठ्याअभावी कारखाने बंद होण्याची भीती आहे. मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असणारे लघु उद्योग बंद झाले आहेत. कारखान्यांमध्ये मंदीचे सावट आहे.चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी