विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना असावी
By Admin | Updated: January 25, 2015 00:51 IST2015-01-25T00:51:34+5:302015-01-25T00:51:34+5:30
विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले.

विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना असावी
संबित पात्रा यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय छात्र संसदेचा समारोप
नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले.
रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्यावतीने सीआरपीएफ गेटसमोरील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’च्या समारोपीय दिनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘क्वालिटी बेस एज्युकेशन टू बिल्ट द नेशन’ हा चर्चासत्राचा विषय होता. मंचावर जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, मोटिव्हेशनल ट्रेनर उषी मोहनदास, विजय सिन्हा आणि प्रदीप चोपडा होते.
संबित पात्रा यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी भगवान कृष्णासारखे तेजस्वी व मनस्वी व्हावे. सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रदीप चोपडा म्हणाले की, नवनवीन साईटचा शिक्षणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. रिसर्च पेपर आणि विविध कोर्सची माहिती तात्काळ मिळते, शिवाय घरबसल्या विभिन्न भाषाही शिकता येतात. पुस्तक आणि टॅब दोन्ही उपयुक्त असले तरीही पुस्तकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. उषी मोहनदास यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध विषय शिकविले जावेत. विजय सिन्हा यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
मीडियाची भूमिका महत्त्वपूर्ण
तिसऱ्या सत्रात ‘मीडिया ए गेम चेंजर’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, फिल्ममेकर अशोक पंडित, अशोक लुल्ला आणि परशुराम या वक्त्यांनी बाजू मांडली. अशोक पंडित हे काश्मीरचे विस्थापित असून त्यांचा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. प्रकाश दुबे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची बाजू मांडली. प्रिंट मीडियाने नैतिकता टिकवून ठेवावी. परशुराम यांनी इराक देशात बराच काळ वास्तव्य केले आहे. मीडियाच्या भूमिकेचा फटका इराकला बसला आहे. अशोक लुल्ला यांनी सोशल मीडियाचा गेम चेंजर म्हणून उपयोग केला जाऊ शकतो, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी यांनी दोन दिवसात विविध विषयावर नामांकित वक्त्यांनी मांडलेल्या मतांवर भाष्य केले. तिसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’चे आयोजन पुढील वर्षी २२ आणि २३ जानेवारीला होणार आहे. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर डॉ. प्रा. अमिना वाली यांनी आभार मानले. तिन्ही सत्रात जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक डॉ. ओ.एस. बिहारे, समूह संचालक (एमबीए विभाग) डॉ. रवींद्र अहेर, जी.एच. रायसोनी लॉ स्कूलचे प्राचार्य डॉ. जयंत एल. अपराजित व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)