व्यवसाय पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST2020-12-03T04:17:39+5:302020-12-03T04:17:39+5:30
नागपूर : कोरोना महामारीत केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलली असून काही ठोस योजनाही राबविल्या आहेत. अशा स्थितीत व्यवसायाला पुनरुज्जीवित ...

व्यवसाय पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न व्हावा
नागपूर : कोरोना महामारीत केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलली असून काही ठोस योजनाही राबविल्या आहेत. अशा स्थितीत व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोज करे यांनी येथे केले.
आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी वक्ते सीतारामन अय्यर, वैभव जैन आणि नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी उपस्थित होते.
मनोज करे म्हणाले, कोरोना महामारीपूर्वी विकास दरात घसरण होत होती. कदाचित नवीन योजना बनविली जात होती. पण महामारीच्या संकटाने या योजनेचा निष्कर्ष काढणे कठीण झाले आहे. पण आता सावधानता बाळगून व्यवसायाचे चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रभावी प्रयत्न व्हावेत. सरकारने कमी गुंतवणुकीवर रोख राशी प्रदान केली आहे. सरकारला अशी पावले उचलण्याची आवश्यकता होती. रिझर्व्ह बँकेने चालू खात्यांना उघडण्यासह त्याच्या संचालनासाठी वित्तीय अनुशासन निश्चित करण्याठी दिशानिर्देश जारी केले आहेत.
सीए किरीट कल्याण म्हणाले, प्रत्येक व्यवसायासाठी वित्त आवश्यक आहे आणि केवळ सीए प्रभावीपणे त्याकरिता योजना बनवू शकते. कोरोना महामारी आणि पुढे ग्राहकांची सेवा करण्यासाठी योजनेत वित्तीय मदत आघाडीवर राहणार आहे. सीतारामन अय्यर म्हणाले, कार्यशील भांडवलाची वेळेवर उपलब्धता महत्त्वपूर्ण कारणांपैकी एक आहे.
उपाध्यक्ष साकेत बागडिया, सचिव जितेंद्र सागलानी, विकासा अध्यक्ष अक्षय गुल्हाने, जुल्फेश शाह, मुर्तजा हुसेन, सुरभी कस्तुरीवाले, उमंग खंडेलवाल, प्रदीप लालवानी आणि अनेक सीए उपस्थित होते.