शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

यशाला शॉर्टकट नसतो : बनवारीलाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:32 PM

कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

ठळक मुद्देस्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार : जोसेफ राव, धर्मेंद्र जोरे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जोसेफ राव आणि धर्मेंद्र जोरे या दोन ज्येष्ठ पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती होते. व्यासपीठावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, राहुल पांडे उपस्थित होते. यावेळी २१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ या स्वरूपाचा पुरस्कार देऊन दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना राज्यपाल पुढे म्हणाले, समर्पणातूनच पत्रकारितेचे क्षेत्र मोठे झाले आहे. शिफारशीतून पत्रकारिता क्षेत्र चालत नाही. विदर्भातील पत्रकारितेचा स्तर मोठा असून येथील पत्रकारांचा राज्यात दबदबा आहे. आज तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी त्या काळात मर्यादित तंत्रज्ञानाच्या बळावर केलेली पत्रकारिता बरीच मूल्ये शिकवून गेली आहे. स्व. अनिलकुमार यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे पत्रकारिता केली. मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. समारंभाला ज्येष्ठ पत्रकारांसह तरुण पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवपत्रकारांना संदेश देताना ते म्हणाले, जुन्यांचे अनुभव ऐका, त्यातून स्वत:ला घडवा. पत्रकारिता ही समाजसेवेची संधी आहे. मनाला नियंत्रित ठेवण्याचा हा मार्ग आहे, जो महात्मा गांधीनी सांगितला होता. काळ जरा वेगळा आहे, पारदर्शी राहा. समाज आणि कुटुंबाच्या मनात विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.आढावा ग्रंथ तयार कराआजवर पत्रकार संघाने ज्या पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार दिले, त्या सर्व पत्रकारांचे कार्य मोठे आहे. या सर्वांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा स्मृतिग्रंथ काढा, अशी सूचना राज्यपाल पुरोहित यांनी केली. पत्रकारितेतील पुढच्या पिढीसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना धर्मेंद्र जोरे म्हणाले, हा आपणासाठी कौटुंबिक सोहळा आहे. पत्रकाराचे काम कुरिअरमॅनसारखे आहे. समाजापर्यंत तंतोतंत माहिती पोहचविण्याचे आव्हान यात असते. समाजमाध्यमांच्या आजच्या काळात खातरजमा करूनच समाजापर्यंत माहिती पोहचेल, याचेही समाजभान आवश्यक आहे. व्यक्त होण्यावर कालही निर्बंध होते, आजही आहेत. त्यासाठी शालजोडीतून लेखन करण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसरे सत्कारमूर्ती जोसेफ राव यांनीही मनोगत व्यक्त केले.अजय संचेती यांनी आपल्या मनोगतामधून अनिलकुमार यांच्या कार्याचा गौरव केला. पत्रकारितेचे मूल्य जोपासणाऱ्या दोन्ही पत्रकारांना हा पुरस्कार दिल्याने चीज झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. सत्कारमूर्र्तींचा परिचय राहुल पांडे यांनी करून दिला. संचालन रेखा दंडिगे यांनी तर आभार वर्षा बासू यांनी मानले.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर