गॅरंटी नाही ‘नाेकरी’ची, निवड लांबली ‘छाेकरी’ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:56+5:302021-07-28T04:07:56+5:30
नागपूर : सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रात काेराेनाचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. लाॅकडाऊनमुळे लाखाे तरुणांचे राेजगार हिरावले ...

गॅरंटी नाही ‘नाेकरी’ची, निवड लांबली ‘छाेकरी’ची
नागपूर : सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रात काेराेनाचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. लाॅकडाऊनमुळे लाखाे तरुणांचे राेजगार हिरावले गेले तर हजाराेंच्या नाेकरी लागण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. काहींचे नाेकरी गेल्याने तर काहींचे नाेकरी न मिळाल्याने लग्न करण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे. त्यामुळे मागील दाेन वर्षात मॅरेज रजिस्ट्री ऑफिसमध्ये विवाहांची संख्या घटली आहे तर नाेंदणी कार्यालयातही शुकशुकाट पसरला आहे.
मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दरवर्षी सरासरी ३००० ते ३२०० जाेडप्यांचे विवाह हाेतात. मात्र काेराेनाचा प्रकाेप सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी २४९७ विवाहांची नाेंदणी करण्यात आली. यावर्षी सात महिन्यात १७२० विवाह पार पडले. वास्तविक सार्वजनिक विवाह समारंभावर बंदी असल्याने नाेंदणी कार्यालयात विवाह वाढणे अपेक्षित हाेते. मात्र वाढण्याऐवजी विवाह करणाऱ्यांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या नाेंदणी कार्यालयातही विवाहानंतर नाेंदणी करणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. यावरून विवाह व विवाह नाेंदणी घटल्याचे दिसून येत आहे. भारतीय समाजव्यवस्थेनुसार राेजगार किंवा पैसा हा क्रायटेरिया विवाहासाठी अनुकूल मानला जाताे. मात्र राेजगार हिरावल्याने व नाेकऱ्या मिळत नसल्याने विवाहाेत्सुकांच्या अपेक्षांवर विषाणूचा प्रादुर्भाव झाला, असेच म्हणावे लागेल.
कधी किती विवाह झाले?
वर्षी नाेंदणी कार्यालयात झालेले विवाह
२०१८ ३१२०
२०१९ २९७०
२०२० २४९७
२०२१ जानेवारी - ३१७
फेब्रुवारी ४८२
मार्च २७४
एप्रिल २२६
मे २०५
जून २२२
- मनपा नाेंदणी कार्यालयात नगण्य नाेंद
महापालिकेच्या झाेननिहाय कार्यालयात विवाहांची नाेंदणी केली जाते. या दहा झाेन कार्यालयात दरवर्षी ५००० च्यावर विवाह नाेंद केली जाते. मागील दाेन वर्षात ही संख्या २५ टक्केंच्याही खाली आली आहे. त्यातही २०२० पूर्वी पार पडलेल्या विवाहांची नाेंदणी अधिक आहे. झाेन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० च्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत नाेंदणी बंदच राहिल्यासारखी हाेती. नाेव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५०० च्या जवळपास नाेंद झाली. मात्र त्यानंतर विवाह नाेंदणी १०० च्याही खाली आल्याची माहिती त्यांनी दिली.
काेराेना काळात नाेंदणी कार्यालयात विवाह पार पाडण्याचा चांगला पर्याय हाेता. सार्वजनिक समाराेहावर बंदी असल्याने नाेंदणी विवाह वाढेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र तसे झाले नाही. उलट दाेन्ही वर्षात सरासरीपेक्षा ५०० ते ६०० विवाह कमी झाले आहेत. राेजगार जाणे आणि राेजगार न मिळणे, हेच यामागचे महत्त्वाचे कारण ठरले, हेच म्हणावे लागेल.
- सीमा वागदे, जिल्हा विवाह नाेंदणी अधिकारी
माझे इलेक्ट्रानिक्स दुरुस्तीचे दुकान आहे. मार्च २०२० मध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काम ठप्प पडल्यासारखे आहे. बॅंकेचे कर्जही अंगावर झाले आहे. यावर्षी विवाह हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र कामावर परिणाम झाल्याने आणि निर्बंधामुळे विवाह पुढे ढकलावा लागला.
- प्रदीप जाधव, इलेक्ट्रानिक्स शाॅपचालक
आमचे माेबाईल दुरुस्तीची छाेटे दुकान हाेते व आम्ही दाेन्ही भाऊ ते चालविताे. काेराेनापासून काम बंद असल्यासारखेच आहे. मागील वर्षी माझे व बहिणीचे लग्न करण्याचा बेत हाेता. पण काेराेनामुळे दाेन्ही लग्न रद्द करावे लागले.
- शुभम माेहिते