शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठीय संशोधनाला दिशाच नाही

By admin | Updated: February 14, 2016 02:55 IST

आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही.

नितीन गडकरी : ‘संशोधनातून पुनरुत्थान’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपनागपूर : आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही. येथे होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना उपयोगच होत नाही व यासाठी प्रयत्नदेखील दिसून येत नाही. मुळात या संशोधनांना दिशाच मिळालेली नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘व्हीएनआयटी’ येथे आयोजित ‘संशोधनातून पुनरुत्थान’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी केंद्र शासनाच्या ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ.विजय कुमार सारस्वत, खा.अजय संचेती, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय महामंत्री वामन गोगटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात संशोधन होत आहे. परंतु त्याचा उपयोग समाजाला कसा होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी उद्योगक्षेत्राशी समन्वय व संवाद वाढवायला हवा. स्थानिक मुद्यांच्या आधारावर संशोधन झाले तर त्याचा फायदा जास्त प्रमामात होईल व यातून रोजगारनिर्मितीदेखील होऊ शकते. शहरीकरणामुळे ग्रामीण भारत व शहरांमधील दरी वाढत आहे. संशोधनातूनच या समस्येचे निराकरण होऊ शकते. अगदी टाकावू वस्तूलादेखील किंमत मिळवून देण्याची क्षमता संशोधनात आहे. याअगोदर ते अनेकदा सिद्धदेखील झाले आहे. त्यामुळे विविध चर्चासत्रे, परिषदांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालविण्यापेक्षा ‘अप्लाईड’ संशोधनावर विद्वानांनी भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले. यावेळी परिषदेच्या संयोजक डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांनी परिषदेचा आढावा मांडला. आयोजन सहसचिव डॉ.लीना गहाणे यांनी संचालन केले तर आयोजन सचिव डॉ.अरविंद जोशी यांनी आभार मानले.परिषदेच्या अखेरच्या दिवश्ी ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ.माधवन नायर, ‘बीएआरसी’चे वैज्ञानिक बी.एन.जगताप, ‘नीरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वटे यांनी मार्गदर्शन केले. ‘इस्रो’मध्ये देशात शिक्षण घेतलेले अनेक वैज्ञानिक आहेत. अवकाशीय विज्ञान हे भारतीय समाजासाठी आशीर्वाद आहे व याची परंपरादेखील लाभली आहे, असे डॉ. माधवन नायर म्हणाले. (प्रतिनिधी)प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ हवे कशाला?डॉ.विजय कुमार सारस्वत यांनी यावेळी शिक्षण प्रणाली व धोरणांवर जोरदार टीका केली. विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जा घसरला आहे. प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ व प्रत्येक जिल्ह्यासाठी विद्यापीठ हवे, अशी मागणी होत आहे. परंतु याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. याऐवजी संशोधनाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अमेरिका व इतर विकसित देशांच्या गरजांवर आपले संशोधन आधारित असते. परंतु आपल्या देशाला कशाची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून संशोधन व्हावे, असे ते म्हणाले. शिवाय आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या धोरणावरदेखील त्यांनी टीका केली. या विद्यार्थ्यांना नववीनंतर अनेक मूलभूत बाबींचे ज्ञान नसते व उद्योगक्षेत्रासाठी असे विद्यार्थी काहीच कामाचे नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.