शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:41 PM

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले.

ठळक मुद्देपीक विम्याची ‘सीएससी’ सेंटर कडून लूट : विमा कंपनीने केले हात वर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला. त्यामुळे या शेतकºयाला पीक विमा काढूनही नुकसान भरपाई मिळू शकली नाही.सचिन वाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहेत. मौजा मालापूर येथे त्यांची साडेतीन एकर शेतजमिन आहे. त्यांनी आपल्या शेतात कापूस आणि सोयाबीन पीक घेतले होते. त्यांनी पीक विमाही काढला. गावातील एका सीएससी सेंटर मधून त्यांनी २३८० रुपये विमा हप्ता ऑनलाईन भरला. त्याची पावतीही त्यांना मिळाली. पुढे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. पंचनाम्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केले असता, विम्याच्या हप्त्याचे पैसेच जमा झाले नसल्याचे त्यांना कळाले. पुढे त्यांनी माहिती घेतली असता सीएससी सेंटरकडून ऑनलाईन पैसेच भरण्यात आले नसल्याचे लक्षात आले. वाट यांनी सीएससी सेंटरच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता पैसे भरल्यावरच पावती मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसेच मिळाले नाही, पंचनामे करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर सीएससी सेंटर चालकाने पैसे परत आल्याचे सांगितले. त्यांना दोन महिन्यानंतर याची माहिती देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. यामुळे वाट यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. तसेच नुकसानही झाले, असा प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाट यांनी उलट तपासणी केल्याने हा सर्वप्रकार समोर आला. ही एकप्रकारे लूट असल्याचे वाट म्हणाले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी