ग्रामीण भागात आताही ७०४६ अॅक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:58+5:302021-05-23T04:07:58+5:30
सावनेर/ काटोल/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा दर अद्यापही १० टक्क्यावर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात ...

ग्रामीण भागात आताही ७०४६ अॅक्टिव्ह रुग्ण
सावनेर/ काटोल/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा दर अद्यापही १० टक्क्यावर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात ५९१५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६३१ (१०.६६ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३९,६७४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,२९,९८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शनिवारी ही संख्या १४७९ इतकी होती. ग्रामीण भागातील ७०४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सावनेर तालुक्यात ८ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर- ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ८ तर ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ३१७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील १७, डिगडोह (६), हिंगणा (४), खापरी मोरे (३), रायपूर , घोडेघाट, नागलवाडी प्रत्येकी २ तर जुनेवानी, टाकळी, मांडवघोराड , अडेगाव, कोतेवाडा, नीलडोह, पांजरी, सुकळी, टेंभरी, वडधामना येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,६९८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १०,६८२ कोरोनामुक्त झाले तर २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात ३९५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ९ तर ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्राअंतर्गत ६, कोंढाळी (३) तर येनवा केंद्राअंतर्गत ७ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यातही एकही रुग्ण नाही
कुही तालुक्यात विविध केंद्रांवर २८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तालुक्यात तब्बल दोन महिन्यानंतरही एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.